लवकर निदान आणि पूर्ण उपचाराद्वारे क्षयरोग बरा होऊ शकतो - सरपंच देवेंद्र चोपडे न्हावी येथे प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाचे उद्घाट...
लवकर निदान आणि पूर्ण उपचाराद्वारे क्षयरोग बरा होऊ शकतो - सरपंच देवेंद्र चोपडे
न्हावी येथे प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन
इदू पिंजारी फैजपूर-
(संपादक हेमकांत गायकवाड)
येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी , डॉ विशाल पाटील जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. राजू तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुकी आणि आरोग्य विस्तार अधिकारी डी. सी. पाटील तालुका आरोग्य पर्यवेक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. क्षयरोग शंकेसाठी रुग्णांना थुंकी नमुना संकलनासाठी स्पुटम कप वितरित केले गेले, तसेच टीबी रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींची 'Cy-TB Test'द्वारे अतिसंवेदनशीलता तपासणी करण्यात आली. सरपंच देवेंद्र चोपडे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले, "लवकर निदान आणि पूर्ण उपचारांद्वारे क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. सामुदायिक सहभागाने आपण न्हावी गाव क्षयरोगमुक्त करू."
अभियानाच्या यशासाठी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स डॉ. अतुल वायकोळे, डॉ. शहनाज तडवी, डॉ.तृप्ती चौधरी, एस टी एल एस नरेंद्र तायडे,तालुका समन्वयक राणे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. आरोग्य सहाय्यक आसिफ मण्यार, आरोग्य सेवक स्वप्निल तायडे, दीपक दीक्षित, दिनेश चौधरी यांचे सहकार्य लाभले
आरोग्य सेविका तथा प्रभारी आरोग्य सहाय्यक महिला श्रीमती पल्लवी भारंबे यांनी Cy-TB तपासणीसाठी मोलाची भूमिका बजावली. आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांचा सहभाग वाढवला.
२०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याच्या ध्येयाने प्रेरित हे अभियान ग्रामीण स्तरावर सक्रिय रुग्ण शोध, त्वरित निदान, उपचार आणि पोषण समर्थनावर केंद्रित आहे. या सर्वसमावेशक उपक्रमामुळे न्हावी गावातील प्रत्येक नागरिक क्षयरोगाविरुद्ध जागरूक होईल, अशी अपेक्षा आहे.

No comments