आदिवासी दिनानिमित्त "आमू आख्खा एक छे "आसेम ची पावरा,बारेला भील भिलाला तडवी भिल संमिश्र पारंपरिक वेशभूषेत रॅली मुबारक तडवी राव...
आदिवासी दिनानिमित्त "आमू आख्खा एक छे "आसेम ची पावरा,बारेला भील भिलाला तडवी भिल संमिश्र पारंपरिक वेशभूषेत रॅली
मुबारक तडवी रावेर / यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
९ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेने जळगांव जिल्हा निवासी संमिश्र आदिवासी बांधवांना एकत्र समावेशक रॅली मिरवणुकीत आदिवासी चे पारंपारिक वाद्य संगीत गीत चालीरीती रुढी परंपरा संस्कृती प्रचार प्रसार प्रबोधन प्रदर्शन करीत आम्ही सर्व आदिवासी एक असल्याचा नारा दिला आणि आदिवासी सांस्कृतिक , पारंपारीक वेशभूषा आदिवासी वाद्य,संस्कृती देखावा सह रॅलीत आदिवासी एकतेचे दर्शन घडविले
यात प्रामुख्याने फुलसिंग बारेला,रतन बारेला,राजु बिर्हाम तडवी, मुबारक तडवी अशरफ तडवी सह भील भिलाला पावरा बांधवांनी सहभाग घेतला जागतिक आदिवासी दिन निमित्त आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेने पावरा बारेला भील भिलाला तडवी भिल या सर्व आदिवासी समाज बांधवांच्या एकत्रित मुठीने एकमुखी एक तीर एक कमान आम्ही आदिवासी एक समान असा नारा देत यावल येथे आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला आदिवासी दिनी रॅलीत आदिवासी चालीरीती परंपरा संस्कृती चे प्रचार प्रसार प्रदर्शन आदिवासींचे पारंपारिक वाद्य, गीत, चालीरीती भाषा गीत आदिवासी वेशभूषा
आदिवासी आदिम संस्कृती देखावा सादर केला या सर्व आदिवासी समावेशक रॅली फैजपूर रस्त्यावरील पेट्रोल पंप जवळून आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमा पूजन करून या रॅलीला सुरुवात केली दरम्यान आदिवासी बांधवांना रावेर यावल तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ जावळे, राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस धनंजय शिरीष चौधरी मनसेचे चेतन भाऊ आढळकर डॉ कुंदन फेगडे, अतुल पाटील यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे सर भीम आर्मी राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकारी यांनी भेटी देऊन आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या सोबतच परंपरागत आदिवासी वाद्य व गीतावर ठेका ही धरला
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची रॅली आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत मिरवणूक मार्गाने शासकीय कार्यक्रम स्थळ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय प्रकल्प कार्यालयातील कार्यक्रमात फैजपूर उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी बबनराव काकडे आमदार अमोलभाऊ जावळे धनंजय शिरीष चौधरी प्रभाकर अप्पा, प्रकल्प अधिकारी अरुण पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी माहुरे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आदि सज्ञ आदिवासी पावरा बारेला भील भिलाला तडवी भिल समाज बांधवांसह आदिवासी बांधव पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments