adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बोलेरो पिकअप ची दुचाकीला धडक, युवकाचा जागीच मृत्यू मोठा वाघोदा - वडगाव रस्त्यावरील घटना

 बोलेरो पिकअप ची दुचाकीला धडक, युवकाचा जागीच मृत्यू मोठा वाघोदा - वडगाव रस्त्यावरील घटना  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत ग...

 बोलेरो पिकअप ची दुचाकीला धडक, युवकाचा जागीच मृत्यू

मोठा वाघोदा - वडगाव रस्त्यावरील घटना 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अंकलेश्वर- बुऱ्हानपूर महामार्गावरील मोठा  वाघोदा बु। गावाचे पुढे सुकी नदी जवळील राजदीप पेट्रोलपंपाचे अलीकडे कुलदीप पाटील यांचे शेताजवळ वळणावरील रस्त्यावर बोलेरो पिकप मालवाहु गाडी क्रमांक MH-04-KU-8257 या चारचाकी वाहनाने हयगयीने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवित आणुन समोरुन येणारी बजाज कंपनीची प्लॅटीना काळ्या रंगाची मोटर सायकल क्रमांक MH-19-ED-3956 वरील मोटारसायकलस्वार विकास शशिकांत धांडे वय 28 रा. रोझोदा ता. रावेर जि. जळगाव यांच्या दुचाकीला समोरुन धडक दिली या धडकेत सदर  मोटारसायकलस्वार विकास शशिकांत धांडे वय 28 रा. रोझोदा ता. रावेर जि. जळगाव यांचा जागीच मृत्यू झाला 


याबाबत सावदा पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन 212/2025 BNS Act 2023 चे कलम-106 (1), 281, 125(A),125(B), 324(4) सह मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे तक्रारदार - भूषण शशिकांत धांडे वय ३० वर्ष रा. जितेंद्र नगर रोड रोझोदा.ता. रावेर जिल्हा जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंकज गोकुळ धनगर रा. चहार्डी ता. चोपडा यांचे विरुद्ध 

सावदा पोलीस स्टेशन ला सीसीटीएनएस गुरन 212/2025 BNS Act 2023 चे कलम-106 (1), 281, 125(A),125(B), 324(4) सह मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ 1690 विनोद तडवी हे करीत आहेत

No comments