दहिगाव यावल हत्याकांड : विशेष समिती मार्फत चौकशी करा;- एकता संघटनेसह विविध संघटनांची मागणी इदू पिंजारी फैजपूर / भरत कोळी यावल (संपादक -:- ...
दहिगाव यावल हत्याकांड : विशेष समिती मार्फत चौकशी करा;- एकता संघटनेसह विविध संघटनांची मागणी
इदू पिंजारी फैजपूर / भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दहिगाव यावल येथे इम्रान पटेल यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला असून ज्यांनी खूनन केला ते दोघी आरोपी नावे ज्ञानेश्वर गजानन पाटील व गजानन रवींद्र कोळी हे स्वतः पोलिस स्टेशन मध्ये जाऊन अटक करून घेतली.
एकता संघटन यावल येथे दाखल
सदर हत्याकांड बाबत जळगाव जिल्हा एकता संघटना यावल येथे पोहचली रुग्णालयात व पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली .
यावल येथे उपस्थित पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्याशी फारूक शेख जळगाव, कुर्बान शेख, फैजपूर,जावेद जनाब मारुळ व यावल चे अँड अलीम खान यांनी समक्ष बोलणी करून समस्या व उणिवा सादर केल्या त्यावर पोलिस अधीक्षक डॉ रेड्डी यांनी समाधानकारक असा तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व हा खुनाचा प्रकार जरी निर्गुण असला तरी त्यातील आरोपींना कठोर शिक्षा होईल व तपास पूर्णत्वाकडे लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले.
हत्येची चौकशी विशेष समिती मार्फत करा
सदर अत्यंत निर्गुण हत्याकांड हा अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी सुद्धा विशेष समितीमार्फत एका महिन्याच्या आत करण्यात यावी अशी मागणी करीम सालार, एकता संघटनेचे फारुक शेख, राष्ट्रवादी पक्षाचे नदीम मलिक, कौमी एकटाचे कुरबान शेख, हुफ्फाझ फाउंडेशनचे रहीम पटेल, नोबल न्यूज चे मतीन पटेल, सामाजिक कार्यकर्ते अनिस शाह, एस डी पीआयचे मौलाना कासिम नदवी, अजित पवार राष्ट्रवादी गटाचे कासिम उमर, अयाजअली सैयद, खालिद बागवान इरफान सालार, जिया बागवान, इम्रान शेख, हाजी युसुफ,देशमुख, आदींनी पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्याकडे केली आहे.
अंत्ययात्रेत हजारोची उपस्थिती
दहीगाव येथे अंतिम यात्रा निघाली असता यात हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम सह जळगाव शहरातील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावल पोलिस स्टेशन येथे पोलिस अधीक्षक डॉ रेड्डी यांच्याशी चर्चा करतांना फारुक शेख व इतर संताप व्यक्त करीत असलेल्या जमावाला सामोरे जाऊन त्यांचे समाधान करतांना फारुक शेख, अनिस शाह, मतीन पटेल, कुर्बान शेख, जावेद जनाब, अँड अलीम खान दिसत आहे
No comments