न्हावी येथिल मंदिरामधून ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील ईगल सांस्कृतिक मंड...
न्हावी येथिल मंदिरामधून ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील ईगल सांस्कृतिक मंडळाच्या दुर्गा देवी मंदिरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना ३१ ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजता घडली. चोरी करणारे दोन्ही संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले. न्हावी गावातील दुर्गादेवी मंदिरातून तब्बल ७० हजारांचा ऐवज चोरतांना चोरटे सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झालेले असून चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील असलेले ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, एक ग्रॅमचे मणी, ३ ग्रॅमचे कानातील दागिने असे ७० हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागिने लांबवले. चोरीचा हा प्रकार रविवारी सकाळी नारायण नेमाडे मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी आल्यावर उघडकीस आला. त्यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. त्यात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती देवी मूर्तीवर असलेले दागिने काढताना दिसून आले. काही दिवसांपूर्वी याच परिसरात घरफोडी झाली होती. गेल्या तीन महिन्यात झालेली ही चौथी चोरी आहे. परिसरात काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होते आहे.
No comments