चोपडा येथे वर्षावास पुष्पमाला सात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा ता.चोपडा येथील गौतम नगर येथे दि.बुद्धिस...
चोपडा येथे वर्षावास पुष्पमाला सात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा ता.चोपडा येथील गौतम नगर येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षवास कार्यक्रम जिल्हाच्या व राज्याच्या नियोजनानुसार सुरू असून आज वर्षवास पुष्प माला क्रमांक सात संपन्न झाला, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जानकीराम शंकर सपकाळे हे होते. सदर वर्षवास मालिकेचे उद्घाटन आयोजक बारकू सपकाळे, प्रभाकर सोनवणे,अनिता सपकाळे, प्रतिभा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
आजच्या विषय महामंगल सूत्त या विषयावर प्रवचनकार सुकदेव बाविस्कर यांनी व सुदाम करंकाळ यांनी अनित्य-आमत्य दुःख या विषयावर धम्म देसना दिली.यावेळी बापूराव वाणे तसेच दिवाणजी साळुंखे,वसंत शिंदे, दिक्षा सोनवणे यांनी गीतातून मार्गदर्शन केले. वर्षावास कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहर अध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी केले.
सदर कार्यक्रमास बापूराव वाणे,जानकीराम सपकाळे,भरत शिरसाठ,सुदाम करंकाळ, सुकदेव बाविस्कर, बारकू सपकाळे, प्रभाकर सोनवणे,वसंत शिंदे,प्रवीण करंकाळ,गौतम नगरातील व इतर बौध्द उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रभाकर सोनवणे, बारकू सपकाळे यांच्या परिवाराकडून भोजनदान देण्यात आले.

No comments