स्थानिक वाशिम येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहावर सकल वाशिम करांच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.... वाशीम प्रतिनिधी (संपादक -;- हेमकांत...
स्थानिक वाशिम येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहावर सकल वाशिम करांच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न....
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -;- हेमकांत गायकवाड)
स्थानिक वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर मातेचा मृत्यू झाला होता त्या मातेचे नाव स्व. श्वेता पडघाने असून या घटनेला दोन ते तीन दिवस उलटली असून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली नाही. म्हणून आज दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी समस्त वाशिम करांच्या वतीने
सविस्तर वृत्त असे की दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हास्तरीय सामान्य रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर मातेचा करू नंतर झाला होता . या मातेला अतिरक्तस्त्राव झाल्याने व चुकीच्या पद्धतीने तिच्यावर उपचार केल्याने तिचा करुण अंत झाला होता. अप्रशिक्षित डॉक्टर्स व अनुभव नसलेल्या डॉक्टरांनी तिचा बळी घेतला असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. म्हणून या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी संबंधित आरोपींवर सदोष मनुष्यवधाचां गुन्हा ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता 106 नुसार गुन्हा दाखल करावा ,त्याच्यावर ॲट्रॉसिटीचां गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपस्थितीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सामान्य रुग्णालयामधील होणारा भोंगळ कारभार आणि रुग्णांवर होत असलेल्या चुकीच्या उपचाराचा सुद्धा पाढा यावेळी रचण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सामान्य रुग्णालयातील सुख सुविधा वाढली पाहिजे, कोणत्याही रुग्णाचा जीव गेला नाही पाहिजे, रुग्णाला हवी तशी वैद्यकीय सुविधा भेटली पाहिजे याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . ही बैठक समस्त वाशिम करांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी पार पडली. या बैठकीला मिलिंद उके सर, सुभाष अंभोरे, सुरेश सोनोणे, राजू पाटील किडसे, संजय वैरागडे, दिलीप भाऊ भेंडेकर, दौलतराव हिवराळे, माधव डोंगरदिवे, जगदीश कुमार इंगळे, जगदीश मानवतकर, महादेव कांबळे, राजकुमार पडघान, अरुण शेळके, संतोष इंगळे, राजू धोंगडे, सौ. वैशालीताई मेश्राम चेतन इंगोले, रवी वानखडे, फकीरा कर्डिले, विजय लांडकर, शाहरुख मांजरे, आर.के पाटोळे, ॲड.सचिन पट्टेबहादूर, विठ्ठल भालेराव, प्रवीण पट्टेबहादुर , रामेश्वर पाटोळे राहुल खडसे, प्रदीप खडसे, सौ.मालती ताई गायकवाड, सौ.रचना कोकरे, गोवर्धन राऊत, अनिल खडसे, अजय पडघाने, समाधान खडसे, अरुण पाटील, सौ.सुनीता भालेराव, सौ .वंदना वैरागडे, सौ.संध्याताई पवार, सौ.वैशालीताई लबडे , सौ ज्योती भगत , सौ.गीता तूपसुंदर , गोवर्धन राऊत संजय कुचेकर आदीसह सर्व वाशिमकरांची उपस्थिती होती.

No comments