adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी मुला -मुलींसाठी पोलीस आणि सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षणाबाबत व्याख्यानमाला संपन्न

 समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी मुला -मुलींसाठी पोलीस आणि सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षणाबाबत व्याख्यानमाला संपन्न   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:...

 समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी मुला -मुलींसाठी पोलीस आणि सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षणाबाबत व्याख्यानमाला संपन्न  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- .हेमकांत गायकवाड)

      भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा, व जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र ,यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुला - मुलींसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण याबाबत व्याख्यानमालेचे आयोजन 29/8/2025 रोजी करण्यात आले होते.

         याप्रसंगी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र, यांचे पदाधिकारी मा.वाल्मीक बिलसोरे ,मा.एडवोकेट उमेश मराठे, अनिकेत मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर सर हे होते.तर  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आशिष गुजराथी यांनी केले.  सूत्रसंचालन व आभार प्रा. नारसिंग  वळवी यांनी केले.

  सदर व्याख्यानमालेत सुरुवातीला मा. वाल्मीक बिलसोरे सर यांनी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था(TARTI मार्फत पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण या योजने चे उद्देश व स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगताना म्हणाले की, ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागा अंतर्गत कार्य करते. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी उमेदवारांना सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाते. यासाठी 72 हजार रुपये एका उमेदवारासाठी खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी एकूण शंभर उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे असे म्हणाले तर एडवोकेट उमेश मराठे यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हणाले की, सदर आदिवासी उमेदवारांना फॉर्म भरण्यापासून ते निवड होईपर्यंत ही संस्था मार्गदर्शन करणार आहे.  याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments