पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक ...
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २९/०८/२०२५ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत चोपड्याचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा मतदारसंघातील यांनी विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली व विकासकामांसाठी निधीची मागणी केली.
१) चोपडा तालुक्यातील लासूर व धानोरा येथे नवीन रुग्णवाहिका देण्यात याव्यात अशी मागणी केली असता पालकमंत्री महोदयांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लासुर व धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांसठी नवीन रुग्णवाहिकांच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे निदेऀश दिले.
२) जिल्हा वार्षिक योजनेतून चोपडा तालुक्यात एक नवीन ३३ कें.व्ही.ए नवीन उपकेंद्र उभारण्यात यावेत अशी मागणी केली.
३) चोपडा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जीर्ण पोल व इलेक्ट्रिक तारांमुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो तसेच दुर्घटना होऊन आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता यामुळे ही जीर्ण पोल व तारा बदलविण्यासाठी महावितरणने गावनिहाय आराखडा तयार करून चोपडा मतदारसंंघासाठी नवीन ५०० इलेक्ट्रिक पोल व तारा देण्यासाठी निधीची तरतूद करावी
४) यावल वनविभाग हा प्रामुख्याने सातपुडा पर्वताच्या रांगेत असल्याने नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात वास्तव्य करणाऱ्याआदिवासी बांधवांचे जीवनमान उचवण्यासाठी व वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुनर्विनयोजनंतर्गत वाढीव तरतूद करावी.
अ) वैजापूर ता. चोपडा रेंज अंतर्गत आबापाणी येथे स्थानिक लोकांच्या मदतीने कॅम्पिंग साईट तयार करण्यासाठी व लोटस पार्क उभारण्यासाठी २ कोटी निधीची तरतूद करावी .
ब) चौगाव येथील विजयगगड किल्ला येथे ट्रेकिंग स्पॉट,रस्ते, किल्ल्यासाठी पायऱ्या, रेलिंग, सेल्फी पॉईंट व मूलभूत पायाभूत सुविधांसाठी २ कोटी निधीची तरतूद करावी.
५) कठोरा येथे ८४ घरकुल लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या जागेवर ग्रामपंचायत विरोध करत असल्याने या लाभार्थ्यांना घरकुल बांधणे साठी तत्काळ तीच जागा देणेबाबत आदेशीत करावे.
६) बालगंधर्व नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे ,खा. स्मिताताई वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.किशोर अप्पा पाटील,आ. अमोल पाटील,आ. मंगेश चव्हाण , आ. अमोल जावळे,मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम,अतिरीक्त पोलीस अधिक्षक अशोक नखाते साहेब,जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,प्रकल्प अधिकारी अरुण पवार हे उपस्थित होते.
No comments