सुनील साळवे समाजसेवेचे परीस- अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे रेड क्रॉसचे वतीने साळवेंचा सत्कार शौकतभाई शेख / श्रीरामपूर (संपादक -:-...
सुनील साळवे समाजसेवेचे परीस- अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे
रेड क्रॉसचे वतीने साळवेंचा सत्कार
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील डी.डी.काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशासकीय इमारत याठिकाणी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले सुनील साळवे लोखंडाचे सोने करणारे परीस आहेत.परीस जसे आपल्या सहवासाने लोखंडाचे सोने करतो त्याच प्रकारे सुनील साळवे त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते त्यांच्या सारखेच तयार करतात.त्यांचा जनसंपर्क व लोकसंग्रह खूप मोठा आहे त्यांच्यातील चांगुलपणामुळे व गुणांमुळेच इतका मोठा परिवार त्यांनी जोडला असल्याचे सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षण विभाग, उच्च व माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा 'गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार' सुनील साळवे यांना प्रदान करण्यात आला त्यानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वतीने साळवेंचा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचे शुभहस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अध्यक्ष मनोगतामधून सोमनाथ वाकचौरे यांनी सुनील साळवे यांच्याबद्दल वरील गौरवद्गार काढले.
मनोगत व्यक्त करताना प्रांत अधिकारी किरण सावंत म्हणाले की,इंडियन रेड क्रॉस सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असताना सुनील साळवे यांनी रेड क्रॉसचे माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे केलीत.निराधार, गोरगरीब,आदिवासी, दिंन दुबळ्यापर्यंत रेड क्रॉसचा मदतीचा हात पोहोचवला. तेव्हा सुनील साळवे म्हणजे समाजसेवेचा मानबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी,प्रा. टी. इ.शेळके, जाकीर सय्यद, डॉ.बाबुराव उपाध्ये,सुकदेव सुकळे प्रा. बारगळ, सतीश कुंकुलोळ , मेजर कृष्णा सरदार व्यावसायिक सुगर आदी मान्यवर उपस्थित होते..
प्रांताधिकारी किरण सावंत यांचे हस्ते श्री व सौ.सुनील साळवे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत प्रवीणकुमार साळवे यांनी तर प्रास्ताविकामध्ये भरत कुंकुलोळ यांनी सुनील साळवे चौफेर व अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
प्रमुख अतिथी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी सांगितले सुनील साळवे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आलेख उंचीवर नेणारा आहे.त्यांचे काम आजच्या पिढीला दिशादर्शक असल्याचे सांगून इतरांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले
यावेळी शोभा शेंडगे, गणेश पिंगळे, डॉ.संजय दुशिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सुनिल साळवेंच्या कार्याची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी डी.डी काचोळे विद्यालय, शा. ज.पाटणी विद्यालय,भास्करराव गलांडे विद्यालय अशोकनगर, त्रिदल माजी सैनिक संघटना,गणेश विद्यालय गणेशनगर,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, नूतन विद्यालय वावी, डावखर कन्या विद्यालय श्रीरामपूर, श्रीरामपूर तालुका मुख्याध्यापक संघ आदी विविध विद्यालये ,संस्था,संघटनांचे वतीने सुनील साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सुनील साळवे यांनी शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात काम करणासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी,अधिकारी सभासद यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी भरत कुंकुलोळ,प्रवीण साळवे,गणेश थोरात,केशव धायगुडे, अवधूत कुलकर्णी,संजय दुशिंग,विनीत कुंकुलोळ, बदर शेख,पोपटराव शेळके, सुरेश वाघुले,सचिन चंदन,सुरजनं,साहेबराव रक्ते, सुखदेव शेरे,बाळासाहेब पाटोळे,राजू केदारी, अरुण कटारे,श्रावण भोसले,विश्वास भोसले, शोभा शेंडगे,पुष्पाताई शिंदे,सविता साळुंके,माया चाबुकस्वार, सुवर्णा बोधक,स्वाती पुरे, निर्मला लांडगे आदींनी परिश्रम घेतले
कार्यक्रमास रेड क्रॉस सोसायटी आजीव सभासद,डी.डी.कचोळे विद्यालय, शा . ज. पाटणी विद्यालय स्टाफ ,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचलन नानासाहेब मुठे यांनी तर आभार अवधूत कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुक्यातील विविध संस्थांची पदाधिकारी समाजातील प्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिक तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments