adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खड्ड्यांत 'बेशरम'ची रोपे; प्रहार जनशक्ती पक्षाचं अनोखं आंदोलन मलकापूरमध्ये गाजलं

  खड्ड्यांत 'बेशरम'ची रोपे; प्रहार जनशक्ती पक्षाचं अनोखं आंदोलन मलकापूरमध्ये गाजलं अमोल बावस्कार बुलढाणा  (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 खड्ड्यांत 'बेशरम'ची रोपे; प्रहार जनशक्ती पक्षाचं अनोखं आंदोलन मलकापूरमध्ये गाजलं


अमोल बावस्कार बुलढाणा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विदर्भाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मलकापूर शहरातील चाळीस बिघा परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. "रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?" असा सवाल निर्माण करणाऱ्या या परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांना "बेशरम"चे झाड भेट देऊन निषेध नोंदवण्यात आला. एवढेच नव्हे तर, या खड्ड्यांतच बेशरमची रोपे लावण्याचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी, सुरक्षेशी आणि मूलभूत सुविधांशी संबंधित समस्यांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे.

लोकशाही की हुकूमशाही?

याप्रकरणी आणखी एक गंभीर बाब म्हणजे उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांचे कथित वक्तव्य. अजय टप यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आज सकाळी उपमुख्याधिकारी साहेब यांच्याशी फोनवर संवाद झाला असता त्यांनी 'आता पुढे निवेदन देऊ नका' असे सांगितले." यावर प्रतिक्रिया देताना अजय टप म्हणाले की,

"हा लोकशाहीचा आणि संविधानाचा थेट अपमान आहे. नागरिकांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न चालू आहे."

प्रशासनाचे मौन खड्ड्यांपेक्षा खोल?

या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शहरी भागातील मूलभूत सुविधांसाठी लढणाऱ्या जनतेच्या आवाजाकडे आता प्रशासन लक्ष देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments