मनवेल सोसायटीची वार्षिक सभा खेडीमेळीत संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल विविध कार्यकारी सोसायटीची ९९ ...
मनवेल सोसायटीची वार्षिक सभा खेडीमेळीत संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल विविध कार्यकारी सोसायटीची ९९ वी वार्षिक सभा सोसायटीचे चेअरमण भरत धनसिंग चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी महालक्ष्मी मातेच्या प्रतिमेला हार गोरख दोधु चौधरी व ग्राम पंचायत सदस्य सुर्यभान पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून हार घालून सभेला सुरुवात करण्यात आली.
संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे यांनी अहवाल वाचुन दाखविले. अजेंडा वरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले संस्थेच्या हितासाठी शेतकऱ्यांनीकर्ज मुदतीत भरुन शासनाच्या पंजाबराव कृषि योजना अंतर्गत मिळणाऱ्या ३ टक्के व्याजाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमण भरत धनसिंग चौधरी यांनी सभेत उपस्थित सभासदांना केलेयावेळी पाटील, हुकूमचंद पाटील, हरीभाऊ धिवर, काशिनाथ पाटील, युवराज पाटील, विनोद पाटील, धर्मराज पाटील, रायसिंग भालेराव, विनोद पाटील, कांतीलाल पतील, विजय पाटील सह शेतकरी उपस्थित होते.

No comments