शाळेची प्रवासी पास ची मुदत संपल्यामुळे शाळकरी मुलाला उतरवले बस मधून चोपडा आगार प्रमुख यांच्याकडे बिरसा ब्रिगेड सातपुडा संघटने कडून कारवाईची ...
शाळेची प्रवासी पास ची मुदत संपल्यामुळे शाळकरी मुलाला उतरवले बस मधून
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बिरसा ब्रिगेड सातपुडा संघटने कडून चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चोपडा तालुक्यातील उनपदेव येथिल एक आदिवासी विद्यार्थ्यी, बादल राजाराम बारेला जो अडावद शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असून,तो दररोज एसटी बसने शाळेत प्रवास करीत असताना त्याची मासिक पास १७/०८/२०२५ रोजी संपली होती.परंतु आर्थिक परिस्थिती गरिबीची हालाकीची असल्याने त्याच्याकडे पास काढण्यासाठी पैसे नसल्याने तो विद्यार्थी नियमित शाळेत जाण्यासाठी रोजच्या प्रमाणे बस ने दिनांक १९/०८/२०२५ रोजी सकाळी शाळेत जात असताना,त्याची मासिक बस पास संपली या कारणमुळे चोपडा आगार मधील (वाहक) कंडक्टरने त्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली.
त्या लहान मुलाला गावापासून सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरावर,निर्जन ठिकाणी भर पावसात गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले. यावेळी कंडक्टरने त्या विद्यार्थ्याशी बोलताना अपशब्द वापरले आणि त्याची मनःस्थिती समजून न घेता त्याच्यासोबत अतिशय उद्धट वर्तन केले. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असताना एका लहान, निरागस मुलाला अशा प्रकारे रस्त्यावर एकटे सोडणे हे अत्यंत अमानुष आणि बेजबाबदारपणाचे कृत्य आहे.
या घटनेमुळे तो विद्यार्थी प्रचंड घाबरला आणि त्याच्या बालमनावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. तसेच चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्याकडे निवेदन सादर करते वेळी बिरसा ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास पावरा व त्यांचे सहकारी तसेच उपसरपंच प्रमोद बारेला व सामाजिक कार्यकर्ते नामा पावरा मेलाने हे उपस्थित होते.
प्रतिक्रिया
उपसरपंच प्रमोद बारेला, कर्जाने
जळगांव जिल्ह्यात चोपडा तालुका हा अनुसूचित जमती साठी राखीव आहे,शाळकरी मुलांना शिकण्यासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करावी अशी मागणी करीत आहे.


No comments