पैगंबर जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले शाळेत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न प्रेषितांनी मानवजातीला दया,करुणा,समानता आणि सेवाभावचा संदेश दिला - ए...
पैगंबर जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले शाळेत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न
प्रेषितांनी मानवजातीला दया,करुणा,समानता आणि सेवाभावचा संदेश दिला - एजाज तांबोली
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा (स.) पैगंबर यांनी मानवजातीला दिलेला संदेश म्हणजे दया, करुणा, समानता आणि सेवाभाव. त्या शिकवणीला अनुसरून आपण आज समाजासाठी उपयुक्त असा रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केला आहे.
रक्तदान हे जीवनदान आहे. पण त्यासाठी सर्वात पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे आपला रक्तगट माहित असणे. आपला रक्तगट माहिती असेल तर आपत्कालीन परिस्थितीत आपण त्वरित मदत करू शकतो, तसेच दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यास धावून जाऊ शकतो. हा उपक्रम म्हणजे केवळ तपासणी नाही, तर सेवाभावाची एक सुरुवात असल्याचे प्रतिपादन अल करम हॉस्पिटलचे एजाज तांबोली यांनी केले.
अल करम हॉस्पिटलच्या वतीने हजरत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नगर शहरातील मुकुंदनगर याठिकाणी असलेल्या सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डाॅ. अब्दुस सलाम सर,फरीदा भाभी, गौसिया तांबोळी, अल करम हॉस्पिटलचे एजाज तांबोली, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, शिक्षक शेख फरजाना दिलावर, शेख अस्लम पटेल, शेख शाहिन, शेख हिना, पठाण फरहान उज़मा , शेख यास्मीन व शेख सुलताना आदी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला पैगंबर यांच्या जीवनातील एक मोठा संदेश आठवतो "सर्वोत्तम मनुष्य तो आहे जो दुसऱ्यांच्या कामी येतो."
आपण सर्वजण जर ही शिकवण आपल्या जीवनात उतरवली तर समाजात एकोपा, आरोग्य आणि बंधुभाव नक्कीच वृद्धिंगत होईल.असे आबीद दुल्हे खान यांनी मनोगत व्यक्त करताना नमुद केले.
मुख्याध्यापक नौशाद सय्यद यांनी आयोजकांचे, डॉक्टरांचे आणि या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानत. अल्लाह ताआला आपल्याला अशा समाजोपयोगी कार्यात नेहमी यश देओ आणि पैगंबर यांच्या शिकवणी नुसार चालण्याची तौफीक देवो ही दुआ केली.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments