चोपड्यात साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) साहित्यरत्न ...
चोपड्यात साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साहित्यरत्न डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात वार शुक्रवार रोजी दिनांक.०१/०८/२०२५ रोजी जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या आणि शहरात भव्य दिव्य मिरवणू काढण्यात आली मिरवणुकीचा मार्ग भूपेंद्र गुजराती यांचे घर शहर पोलीस स्टेशन गांधी चौक मेन रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीच्या आयोजना करिता मनोज नारायण नेटके सामाजिक कार्यकर्ता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार दीपक साहेबराव बोराडे कार्याध्यक्ष करण बाबुराव जाधव जयंती समिती अध्यक्ष सुधाकर रमेश साळवी उपाध्यक्ष समाधान प्रताप साळवे खजिनदार शरद रमेश नेटके सचिव मार्गदर्शक विकास प्रभाकर नेटके कोषाध्यक्ष जितेंद्र सुरेश भोंगे सोपान भोंगे मधुकर साळवे सुनील साळवे प्रकाश नेटके यांनी अनमोल परिश्रम घेतले.

No comments