भुसावळ टपाल विभागात सोमवारपासून 'एपीटी' प्रणाली ; उद्या सात तालुक्यांतील सेवा असणार बंद रविंद्र कोळी प्रतिनिधी संपादक हेमकांत ग...
भुसावळ टपाल विभागात सोमवारपासून 'एपीटी' प्रणाली ;उद्या सात तालुक्यांतील सेवा असणार बंद
रविंद्र कोळी प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
जळगाव : भारतीय टपाल विभागात 'ए.पी.टी.' (अत्याधुनिक टपाल तंत्रज्ञान) या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भुसावळ टपाल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भुसावळ, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा व यावल या सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये सुधारित प्रणाली दि. ४ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार
आहे.ए.पी.टी. अॅप्लिकेशनच्या माध्यमातून टपाल सेवा अधिक जलद, सुरक्षित, ग्राहकाभिमुख व पारदर्शक होणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पोस्ट ऑफिसमधील व्यवहारांची प्रक्रिया डिजिटल रूपात अधिक सुलभ होईल. सेवा वितरणाचा वेग वाढेल, ग्राहकांसाठी इंटरफेस अधिक सहज समजण्याजोगा असेल. तर व ही प्रणाली ग्रामीण व निमशहरी भागांतील नागरिकांनाही स्मार्ट व कार्यक्षम सेवा देण्यासाठी विशेष रचलेली आहे.
4 ऑगस्टपासून सात तालुक्यात सुधारित प्रणाली सुरू होईल.
नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तांत्रिक कामे सुरळीतरीत्या पार पडण्यासाठी दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी या सातही तालुक्यांतील पोस्ट कार्यालयांमध्ये सार्वजनिक व्यवहार बंद राहतील. या काळात कोणतीही टपाल सेवा देण्यात येणार नाही. ही सेवाबंदी केवळ एका दिवसापुरती असणार असून, त्यानंतर ४ ऑगस्टपासून नवीन प्रणालीसह सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होतील व टपाल खाते एक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीची कात टाकणार आहे, असे आव्हाहन श्री मनीष नवलु, अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांनी ग्राहकांना केले आहे.

No comments