adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न्हावी येथे शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट ॲप’ विकसित करण्यासाठी बैठक संपन्न; लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर पुणे यांचा पुढाकार

 न्हावी येथे शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट ॲप’ विकसित करण्यासाठी बैठक संपन्न; लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर पुणे यांचा पुढाकार   इदू पिंजारी फैजपूर...

 न्हावी येथे शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट ॲप’ विकसित करण्यासाठी बैठक संपन्न; लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर पुणे यांचा पुढाकार

 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी स्मार्ट ॲप विकसित करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंदर्भातील अडचणींवर उपाय, वेळेवर माहिती व सल्ला मिळावा, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेती अधिक सुसंगत व्हावी, हा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर ३० जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जे.टी.एम. फ्रूट सेल सोसायटी, न्हावी येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या प्रस्तावित ॲपमध्ये जिओ टँगिंग, सॅटेलाईट इमेजिंग, आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानांचा वापर करून शेतजमिनीची ई-बाऊंड्री निश्चित केली जाणार आहे. शेतामध्ये कुठलीही घुसखोरी किंवा चोरी झाली तर त्या घटनेची सूचना थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर मिळणार असून, त्याच वेळी जवळच्या पोलिस चौकीला सुद्धा अलार्मद्वारे माहिती पोहोचवली जाईल. शेतजमिनीचा पोत आणि आर्द्रतेनुसार योग्य पाणी व खत यांचे मार्गदर्शन, हवामानाच्या आधारे सावधगिरी सूचना, पिकांवरील किडींचे निदान व प्रतिबंधक उपाय, तसेच शेतकऱ्यांना अधिकृत माहिती स्वरूपात या ॲपमधून उपलब्ध होणार आहे. या बैठकीत जे.टी.महाजन पॉलिटेक्निक महाविद्यालय समूहाचे अध्यक्ष शरद दादा महाजन, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, तसेच प्रकाश वराडे, दिलीप चौधरी आणि कृष्णाजी खडसे यांचे मार्गदर्शन लाभले. उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून अनेक महत्त्वाच्या समस्या मांडल्या. शेतातील डी.पी. किंवा ट्रान्सफॉर्मरवरील चोरी, कीटकनाशकांच्या अतिशय वाढलेल्या किंमती, किड येण्याआधी उपाययोजना, जमिनीच्या पोतानुसार योग्य खतांची निवड, हवामानानुसार सावधगिरी सूचना, बाजार समित्यांचे दररोजचे बाजारभाव, पिकांचे ग्रेडिंग निकष, शेतीसाठी उपयुक्त उपकरणांची माहिती आणि उपलब्धता, तसेच शेतमाल खरेदी-विक्री व निर्यातीसाठी डीलर्सची माहिती यांचा समावेश या ॲपमध्ये असावा, अशी शेतकऱ्यांची स्पष्ट मांडणी होती. सदर ॲपच्या विकासासाठी सीईओपी पुणेचे कुलगुरू सुनिल भिरूड, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे उपसंचालक निळकंठ चोपडे आणि पीआयसीटी पुण्याचे प्राध्यापक संदीप वऱ्हाडे यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. हा ॲप शेती क्षेत्रात डिजिटल आणि सशक्त व्यवस्थापनाची नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

No comments