स्व.श्वेता पडघाण यांची मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा... जगदिश मानवतकर सर वाशीम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वाशिम येथील जिल्हा ...
स्व.श्वेता पडघाण यांची मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा... जगदिश मानवतकर सर
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णांमध्ये दि.5 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टरांच्या दुर्लक्षाने एका गर्भवती मातेचा मृत्यू झाला . या मातेचे नाव श्वेता पडघाने असून तिला दोन अपत्य आहेत. एक अपत्य 2 वर्षाचे तर एक बाळ नुकतेच जन्मलेले आहे . अशा मुलांना पोरके करून ही माता या जगाचा निरोप घेऊन डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे केली आहे . तरी या प्रकरणातील दोषी आरोपींवर कठोर कारवाई करा आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी जगदीश मानवतकर आणि समस्त मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, वाशीम येथील जिल्हा सामान्य दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेला भरती केले होते . तिचे सिजर ऑपरेशन दिनांक 4 ऑगस्ट 2025 जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय वाशिम येथे झाले होते. परंतु तब्येत मध्ये फरक न जाणवल्याने जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयने या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे अतीदक्षता ( ICU) विभागात स्थलांतर केले होते. त्यानंतर या महिलेला अतिशय वेदना आणि त्रास होत होता . परंतु तेथील अप्रशिक्षित आणि अनुभव नसलेल्या डॉक्टरांनी, नर्सेसनी, कर्मचारीनी या महिलेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं आणि या महिलेच्या नातेवाईकांना उडवा उडविचे उत्तर दिले असा आरोप या मयत महिलेच्या कुटुंबाने केला आहे. अशातच या महिलेचा मृत्यू दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 11.16 मिनिटांनी झाला . परंतु आम्हाला दुसऱ्या शहरांमध्ये का जाण्यास सांगितले नाही ? आम्हाला अकोल्याला जाण्यास का सांगितले नाही? आमच्या सह्या कागदावर का घेतले नाही? कोणत्या डॉक्टरांनी या महिलेवर उपचार केला? अशा असंख्य प्रश्नांची उत्तर सध्यातरी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम कडे नाही आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन जगदीश मानवतकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि कारवाईची मागणी केली संबंधित प्रकरणांमध्ये वाशिमचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे साहेबांनी या प्रकरणाची समिती नेमून दोषी अधिकारी डॉक्टर , नर्सेस यांच्यावर तात्काळ कारवाई करू असे आश्वासन दिले. परंतु कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असे म्हणताच प्रकरण आणखीन तापले होते . तात्काळ जगदीश मानवतकर आणि पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून संबंधित प्रकरणाची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे दिली . सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींना बेड्या ठोकू असा निश्चय वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांनी बोलून दाखविला आहे . म्हणून हे प्रकरण योग्य दिशेने जावं यासाठी जगदीश मानवतकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्रकरणाची योग्य खबरदारी घ्यावी अशी विनंती केली आहे. तरी यावेळी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे अध्यक्ष जगदीश मानवतकर आणि सर्व मातंग समाज बहुसंख्येने उपस्थित होता . प्रकरणात दोषी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, दोषी अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि मयत महिलेच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपये तात्काळ आर्थिक मदत शासनाकडून झाली पाहिजे , अशा अनेक मागण्या जगदीश मानवतकर यांनी पत्राद्वारे केल्या आहेत. तरी यावेळी परिसरामध्ये तणाव निर्माण होता आणि सर्व परिसर हा शोकाकुल होता.

No comments