adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन:- कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आयोग कटिबद्ध:- सौ. रूपाली चाकणकर..!!

 पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन:- कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आयोग कटिबद्ध:- सौ. रूपाली चाकणकर..!!  संभाजी पुरीग...

 पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन:- कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आयोग कटिबद्ध:- सौ. रूपाली चाकणकर..!! 


संभाजी पुरीगोसावी  ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिता देण्यासाठी असलेल्या लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाईं, निवारण ) 2013 या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायम कटिबद्ध असल्याचे राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्हीके ऍडव्हीयझरी सर्व्हिसेस यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमांस विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ आयोगांच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या... की महिलांना कामांच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आस्थापन प्रशासनाची आहे. त्यांनी महिलांना अत्याचाराविरुद्ध न घाबरता अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करण्याचे आव्हान केले आहे. राज्यांत सुमारे 31 टक्के महिला विविध आस्थापनामध्ये कार्यरत आहेत. महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी न्याय देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून समितीने काम करावे यासाठी महिला आयोगांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही रूपाली चाकणकरांनी स्पष्ट सांगितले आहे.

No comments