adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय शहरातील रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.

मलकापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय शहरातील रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत...

मलकापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय शहरातील रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विशेषत: चाळीसबिघा परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांमध्ये दैनंदिन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत न.प. प्रशासनाला वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेवर न.प. प्रशासनाची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष पाहता, प्रहार जनशक्ती पक्षाने आपला तीव्र निषेध नोंदवित आज ७ ऑगस्ट रोजी उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांना ‘बेशरमचे झाड' भेट देत, शहरातील रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.


शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे. हे खड्डे केवळ वाहनचालकांसाठीच नाही, तर पादचार्‍यांसाठी सुध्दा धोकादायक बनले आहेत. न.प. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यातच आता काही दिवसांवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सह आदी सण येवून ठेपले आहेत. त्यामुळे गणपती, नवरात्रीमध्ये भाविक हे दर्शनाकरीता जात असतात. मात्र रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहता याचा त्रास अधिकच त्यांना सोसावा लागणार आहे. त्याचप्रमाणे आबालवृध्द व विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघातही घडण्याच्या घटना घडत आहेत.

या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत अनेकदा न.प. प्रशासनाला सांगूनही न.प. प्रशासन कुठलीही दखल घेण्यास तयार नाही. त्यातच लोकप्रतिनिधी यांनीतर नागरिकांना जणू वार्‍यावरच सोडल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. न.प. मध्ये कायम मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकारी हे आपल्या मर्जीने येतात अन् जातात तर प्रशासक यांचे सुध्दा न.प. च्या प्रशासकीय कारभारात पाहिजे तेवढे लक्ष नाही. तर लोकप्रतिनिधी हे जनतेच्या मुलभूत सुविधांकडे गांभीर्याने बघण्यास तयारच नाहीत. त्यामुळे पाणी, स्वच्छता, रस्ते असे अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. 

रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेबाबत न.प. प्रशासनाला सांगूनही वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याने आज चक्क प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शांततेच्या मार्गाने न.प. उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांची भेट घेवून त्यांना बेशरमचे झाड भेट देत शहरातील रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.

याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालिकराम पाटील, शहर उपप्रमुख बलराम बावस्कर, प्रभारी महिला शहर अध्यक्षा रश्मीताई इंगळे, अर्जुन पाटील, राहुल तायडे, संजय इंगळे, करण नायसे, निलेश चोपडे यांचेसह प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर व तालुक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments