विद्यार्थ्यांना ज्ञाना सोबत सुसंस्कार व स्किल असणे गरजेचे;साहित्यिक व. पू.होले इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विद्यार्थ्...
विद्यार्थ्यांना ज्ञाना सोबत सुसंस्कार व स्किल असणे गरजेचे;साहित्यिक व. पू.होले
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना सुसंस्कारीत व स्किल फुल सुद्धा होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व पू होले सर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम प्रसंगी केले फैजपूर येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था ने हा कार्यक्रम आयोजित केला होता अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे होते विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर स्किल संपादन करणे स्पर्धेच्या युगात आवश्यक असल्याचे प्रसिध्द साहित्यिक प्रा व पू होले यांनी मार्गदर्शन केले तर भविष्याचा वेध घेऊन आपले ज्ञान प्राप्त करून मोठे व्हावे असा सल्ला माजी आमदार अरुण दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी संस्थेची 27 वी वार्षिक सभा चेअरमन नरेंद्र नारखेडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली सभासदांना यावर्षी 12 टक्के डिव्हिडंड देण्यात येणार असल्याचे नरेंद्र नारखेडे यांनी घोषित केले गुणवन्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे डी एफ ओ राहुल शेवाळे पाल व पू होले माजी आमदार अरुण पाटील पंडितराव कोल्हे प्राचार्य प्रदीप राणे के जी पाटील आर एल चौधरी अनिल नारखेडे व्हा चेअरमन मनोजकुमार पाटील विजय परदेशी सुरेश परदेशी आप्पा चौधरी भास्कर बोन्दे दूध संघ संचालक नितीन चौधरी शेतकी संघ संचालक धनंजय फिरके अनिल लढे हर्षद महाजन या मान्यवरांचे हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले यावेळी कु हिताली रवींद्र झोपे हिने प्रथम श्रेणीत सि ए पदवी प्राप्त केली व कु यज्ञा अनिल लढे रा न्हावी हिने बी ए एम एस ही पदवी प्रथम श्रेणीत व पुष्कर अनिल नारखेडे व हर्षदा भूषण नारखेडे या गुणवन्त विद्यार्थी यांचा विशेष गौरव करण्यात आला प्रास्ताविक चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी केले सूत्रसंचालन व्यवस्था पक सौ जयश्री चौधरी यांनी केले आभार डा गणेश चौधरी यांनी मानले प्रमुख उपस्थिती किरण चौधरी राजेश महाजन चंद्रशेखर चौधरी भास्करराव चौधरी डा पदमाकर पाटील बंडूशेठ माहुरकर सतीश पाटील यांचेसह पालक वर्ग उपस्थित होते राजेंद्र मानेकर राजू मिस्त्री मनोज वायकोळे चंदू पाटील तुकाराम बोरोळे यांनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले

No comments