adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक

 मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक  प्रतिनिधी राधेशाम पावरा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक दिनांक ३ आग...

 मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक 



प्रतिनिधी राधेशाम पावरा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक दिनांक ३ आगस्त रोजी शिरपुर मार्केट कमिटीच्या सभागृहात सपन्न झाली. *मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार हे आढावा बैठकीचे अध्यक्ष होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक उपस्थित होते*.

मानव विकास पत्रकार संघ हा मानव सेवेसाठी काम करतो, नागरिकांच्या समस्या सोडवण्या साठी प्रयत्नशील असतो, लवकरच नागरिकांच्या विविध समस्या चे निवेदन तहसीलदार यांना देनार असे आपले विचार माडतांना डॉ प्रदीप पवार म्हणाले, 

या आढावा बैठकीत तालुका व जिल्हयातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. मानव विकास पत्रकार संघा कडून 10 वी व 12 वीत प्रथम येणाऱ्या गुणवंतांच्या गुणगैरव करण्यात येनार आहे, गुटका बंदी, जिल्यातील अवैध धंदे, घरकुल योजना, मार्केट मधील सेवानिवृत्त लोकांची नियुक्ति, एस टी महामंडळ चा भोंगळ कारभार या विषयी चर्चा करण्यात आली. मानव विकास पत्रकार संघाचे विभागीय सचिव बी व्ही गिरासे, पत्रकार हिरा वाकडे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडीतराव निकम, तालुका अध्यक्ष कैलास राजपूत, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पावरा, तालुका उपाध्यक्ष राध्येशाम पावरा धुळे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, शिरपुर शहर अध्यक्ष भटू धनगर, राजेन्द्र निळकंठ, विलास जाधव, दिपक महाले, रवि पेंढारकर,डैनी चांदे साबीर मनियार, संतोष जव्हेरी,  आदि उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन बी व्ही गिरासे यांनी केले, आभार कैलास राजपूत यांनी मानले

No comments