पोलीस उपनिरीक्षक साजन नाहर्डा व त्याचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना कायमस्वरूपी सस्पेंड करा चोपड्यात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा विराट मोर्...
पोलीस उपनिरीक्षक साजन नाहर्डा व त्याचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना कायमस्वरूपी सस्पेंड करा
चोपड्यात एकलव्य भिल्ल समाज संघटनेचा विराट मोर्चा तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील शासकीय विश्रामगृह येथून एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुमित्रा ताई पवार व कार्यध्यक्ष एडवोकेट सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक तथा एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हा सदस्य यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह येथून दुपारी अडीच वाजेपासून विराट मोर्चाला सुरुवात करण्यात आली सदर मोर्चा पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय पर्यंत शेकडोच्या संख्येत मोर्चा काढण्यात आला व मोर्चा करिता तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजातील महिला पुरुष व तरुण मंडळी उपस्थित होते.
तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वराड येथील तरुण व तरुणी यांनी पळून जाऊन लग्न केले याबाबत तरुणीच्या आई-वडिलांनी गुन्हा नोंद केला होता यात याचा (हात) संशय तरुण-तरुणीच्या आई-वडिलांना गावातीलच काही समाजातील लोकांवर संशय असल्याकारणाने तपास चौकशी कामी सदर महिला व तिचे पती आणि तिघ मुलं यांना बोलविण्यात आले व त्या महिलेस शिवीगाळ व दमदाटी व मुलांना मारहाण करून अंगावरील कपडे काढून नको ते कृत्य करण्यास भाग पाडून किळसवाणी प्रकार त्या पोलीस उपनिरीक्षक साजन नाहर्डा यांनी केलेला आहे त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत व कायद्याच्या पलीकडे जाऊन हे कृत्य यांनी केले पोलीस उपनिरीक्षक साजन नाहर्डा व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना कायमस्वरूपी सस्पेंड करा या मागणी करिता ०१/०८/२०२५ रोजी मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्ष वेधण्याकरिता सदर पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या सहकार्यांनी केलेल्या कृत्या बाबत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली व तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व निवेदनाची दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचारी व त्याच्या सहकार्यांवर उचित कारवाई करण्यात यावी अन्यथा कारवाई न झाल्यास संबंधित तपासी अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात हायकोर्टात पिटीशन दाखल करण्यात येईल व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सूर्यकांत पवार यांनी सांगितले तसेच सदर मोर्चा हा शांत व संयमीपणे कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा कोणतीही कायदा व सुव्यवस्था भंग न होता विराट मोर्चा शांततामय वातावरणात संपन्न झाला.
एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या मागण्या
१) आदिवासी भिल समाजातील एका महिलेला पट्ट्याने हातावर नाहर्डा पोलीस उपनिरीक्षक यांनी मारहाण करून अश्लील शिविगाळ करून अमनुष्यपणे वागणूक केली.म्हणून नाहर्डा पोलीस उपनिरीक्षक व त्यावेळेस घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांवर कायम स्वरूपी निलंबित करून अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा.
२) वराड गावातील अधिवासी भिल समाजातील तरुणांवर अमानुष्य मारहाण व लैंगिक छळ करण्यास लावले. त्या पोलीस उपनिरिक्षक नाहर्डा (PSI) व इतर पोलीस शिपाई यांच्यावर अट्रोसिटि अँक्ट नुसार गुन्हा नोंद करुन त्यांना कायम स्वरुपी निलंबित करण्यात यावे.
३) सामाजिक कार्यकर्ते संजू राजु भिल मांना दिः २३/०७/२०२५ रोजी रात्री १.३० ते २.०० चा सुमारास जितेंद्र सोनवणे रविंन्द्र मेढे,चक्रधर पवार हे पोलीस कर्मचारी संजु राजु भिल चहार्डी कारखाना येथे ड्युटीवर असताना तेथे जाऊन संजू राजु भिल यांनी धमकीच्या स्वरुपात बोलू लागले आज आमचा पोलीस अधिकारी चुकला आहे.म्हणून तुम्ही आती करत आहे दगडाशी गाठ पडते आम्हीतर पुलिस वाले आहोत ह्या धमकी स्वरुपात बोलले ह्या पोलीस कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.


No comments