उद्या पासून तीन दिवसीय आंदोलन होणार- कामगार नेते जगन सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान आर्मी भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
उद्या पासून तीन दिवसीय आंदोलन होणार- कामगार नेते जगन सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान आर्मी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड )
भुसावळ- ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटना तर्फे उद्या दिनांक-25 ऑगस्ट 2025 या रोजी नांदूरा तालुक्यातील टाकळी येथून दुपारी 2 वा. बलिदान लाँग मार्च सामूहिक जल समाधी आंदोलन प्रारंभ होऊन सदर चे सामूहिक जल समाधी आंदोलन जिगाव धरणावर होणार आहे ..याच जिगाव धरणावर विनोद पवार याने जल समाधी आंदोलन करून आपला जीव अतिक्रमण धारकांना मोबदला मिळावा या मागणीसाठी बलिदान दिले आहे..म्हणून या आंदोलनास बलिदान लाँग मार्च असे टायटल नाव दिले आहे व विनोद पवार च्या बलिदाना तूंन प्रेरणा घेऊन हे सामूहिक जल समाधी आंदोलन करण्यात येत आहे.
सदर च्या आंदोलनात एकमेव मागणी करण्यात आली आहे की, जिगाव धरण ग्रस्त सर्व अतिक्रमण धारक यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजने नुसार अतिक्रमण धारक यांच्या बँक खात्यात रक्कम शासनाने वर्ग करावी, तसेच शासनाने तातडीने मोबदला द्यावा या मागणीसाठी नांदूरा रेल्वे स्टेशन येथे दिनांक 1 Sep.25 या रोजी, दुपारी 2 वाजता मोबदला द्या आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन करण्यात येईल.. सदर चे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया संविधान आर्मी, कामगार नेते जगन सोनवणे B.A.L.L.B यांच्या नेतृत्वाखाली होईल. अशी माहिती विदर्भ प्रमुख भिवा भाऊ चोपडे संविधान आर्मी व धनराज गोळे बुलढाणा जिल्हा प्रमुख संविधान आर्मी यांनी दिला आहे....


No comments