पिंपरूड येथील आदिवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा प्रांताधिकारी बबनराव काकडे नी घेतली तक्...
पिंपरूड येथील आदिवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा प्रांताधिकारी बबनराव काकडे नी घेतली तक्रारीची दखल
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारींनी दिले चौकशीचे आदेश
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी /इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर जवळच असलेल्या पिंपरुड येथील पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी शाळेत दि.६ ऑगस्ट रोजी अचानक उपविभागीय अधिकारी कार्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोर्चा धडकला शाळेत शिक्षक व शिक्षिका अन्याय करीत असल्याचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे साहेब आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यावल सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या समक्ष १५० ते २०० आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींनी गव्हाणे माडले. कि इय्यता ८ ते १२ वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनी होते त्यांनी उपविभागीय कार्यालयात धडक मोर्चा नेऊन सांगितले की पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींना पुरेसा सोयी सुविधा नाहीत पुस्तके नाही नियमित तासिका होत नाही
पिण्याचे पाण्याचे अभाव असून शाळेला खेळण्यासाठी ग्राउंड नाही सकाळी नाष्टा जेवण वेळेवर दिले जात नाही शिक्षिका सतत छळ करीत आहे. वस्तीगृहात व रूम मध्ये CCTV कॅमेरे लावले आहेत वरील आदिवासी शाळा शासन मान्यता असून आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात छळ केला जात आहे आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यावल यांनी शाळेबाबत माहिती घेऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना सांगितले की शाळेत तुमच्यावर यापुढे कोणताही अन्याय होऊ देणार नाही हा माझा मोबाईल नंबर घ्या असे प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना त्या ठिकाणी सांगितले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे साहेब यांनी सुद्धा त्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना दिला आणि मला कळवा असे सांगितले उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी सुद्धा शाळेचे चेअरमन पांडुरंग दगडू सराफ यांना बोलावून सांगितले की विद्यार्थी विद्यार्थिनींनवर अन्याय होत असल्याचे सांगितले यावेळी यापुढे शाळेने सोय सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा कारण माझ्यासमोर विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले म्हणणे बोलून दाखविलेले आहेत.या वेळी आदिवासी नेत्या शमीभा पाटील यांनी सुद्धा आदिवासींवर अन्याय होत आहे ते आम्ही कदापि सहन करून घेणार नाही असे इशारा दिला आहे.
+प्रतिक्रिया
पिंपरुड ता यावल येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय अनुदानित आश्रम शाळेतील सोयी सुविधा बाबत विद्यार्थ्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असून याची गांभीर्याने दखल घेतली आहे या संदर्भात शाळेला भेट देऊन चौकशी केली जाईल व विद्यार्थ्याना सोय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था चालक यांना सांगण्यात येईल
अरुण पवार आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल
प्रतिक्रिया
*पिंपरुड ता यावल आश्रम शाळेत ४५० विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत शिक्षण घेत आहे या विद्यार्थ्याना मूलभूत सुविधा न देता तक्रार दिल्यास तुमच्या शाळेच्या दाखल्यावर लाल शेरा मारू अशा धमक्या दिल्या जातात या विद्यार्थ्याचा न्याय हक्कासाठी विद्यार्थी सोबत प्रांत कार्यालयात दाद मागण्यासाठी आलो आहे शामिभा पाटील जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी


No comments