फैजपूर पोलीस स्टेशनतर्फे दंगा काबू योजना तालीम व रूट मार्च इदू पिंजारी /आदित्य गजरे फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दि. 30 ऑगस्...
फैजपूर पोलीस स्टेशनतर्फे दंगा काबू योजना तालीम व रूट मार्च
इदू पिंजारी /आदित्य गजरे फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दि. 30 ऑगस्ट रोजी फैजपूर पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर दंगा काबू रंगीत तालीम घेण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक सो.श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक सो.श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी सो.श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पो.नि. रामेश्वर मोताळे यांनी ही तालीम पार पाडली.
या वेळी फैजपूर उपविभागातील रावेर व निंभोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. दंगा परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रेनेड गॅस गनद्वारे सेल उडवून प्रात्यक्षिक पडताळणी करण्यात आली.त्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फैजपूर शहरातून पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांच्या उपस्थितीत भव्य रूट मार्च काढण्यात आला. या वेळी पो.नि. रामेश्वर मोताळे, पो.उपनिरीक्षक सय्यद, बोकील, गाभणे तसेच रावेर व निंभोरा येथील अधिकारी व सर्व पोलीस स्टाफ उपस्थित होता.
No comments