adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होणार

 ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होणार  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सन 18...

 ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होणार 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सन 1871 साली ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले. यामुळे या जातीमधील समाज बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहील्याने भटक्या व विमुक्त  समाजाला न्यायासाठी विलंब झाला. पर्यायाने याचे दीर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले. स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act हा कायदा रद्द करण्यात आला. आणि या जातींना "विमुक्त जाती"  म्हणजे मुक्त झालेल्या म्हणून घोषित करण्यात आले. भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त  समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट हा दिवस "भटके विमुक्त दिवस"  साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 

त्यामुळे वरणगाव येथे 31 ऑगस्ट रोजी, सकाळी 11 वाजता, ठिकाण  तिरंगा सर्कल चौक,बस स्थानक जवळ आयोजित करण्यात आलेले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब करडक प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भटके विमुक्त बहुजन संघाचे राज्य अध्यक्ष ॲड. शिरीष जाधव, अनिल नाळे संपर्कप्रमुख अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, राजेंद्र गायकवाड युवा अध्यक्ष भटके विमुक्त बहुजन संघ,अरुण गायकवाड ज्येष्ठ समाजसेवक ठाणे जिल्हा, दीपक जाधव नाशिक जिल्हाध्यक्ष भटके विमुक्त बहुजन संघ, रामदास जाधव विदर्भ प्रमुख भटके विमुक्त बहुजन आदिवासी महासंघ, आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तसेच भटके विमुक्त बहुजन वंचित आदिवासी समाज बांधव, व वरणगाव शहरातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी भटके विमुक्त समाजातील बांधव, ओबीसी समाजाचे बांधव, 12 बलूतेदार समाजाचे बांधव आदींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भटके विमुक्त बहुजन संघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या पदाधिकारी कडून करण्यात आलेली आहे.

No comments