adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा ते गलंगी दरम्यान पुलांच्या दुतर्फा असलेले खड्डे ठरताय जीवघेणे!

 चोपडा ते गलंगी दरम्यान पुलांच्या दुतर्फा असलेले खड्डे ठरताय जीवघेणे!   गणपूर ता चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  गलंगी ते चोपड...

 चोपडा ते गलंगी दरम्यान पुलांच्या दुतर्फा असलेले खड्डे ठरताय जीवघेणे! 


 गणपूर ता चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 गलंगी ते चोपडा या 19 किलोमीटरच्या अंतरात हातेड, काजीपुरा व अकुलखेडा गावाच्या आजूबाजूला अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर असलेल्या पूलांच्या दोन्ही बाजूला असलेले खड्डे वाहतुकीसाठी जीवघेणे ठरु लागले असून बांधकाम खात्याने हा रस्ता डांबरीकरण करताना पूर्ण तयार केला,पण हे खड्डेच का सोडले, हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही महिन्यापूर्वी गलंगी ते चोपडा दरम्यान असलेल्या राज्य मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यावर मध्यभागी पांढरे पट्टे ही मारण्यात आले असून त्यावर आता रेडियम स्टिकरही लावण्यात येत आहेत. मात्र हे सर्व करत असताना या रस्त्याच्या दरम्यान असलेल्या पाच-सहा पूलांच्या दोन्ही बाजूला असलेले मोठ मोठे खड्डे का भरले गेले नाहीत, त्यासाठीचा निधी कंत्राटदारांना देण्यात येत नाही का असा प्रश्न आता नागरिक व वाहन चालकांना पडला असून या खड्ड्यांना टाळण्यासाठी प्रत्येक वाहन विरुद्ध बाजूने वाहतूक करत असून दररोज या विरुद्ध बाजूच्या होणाऱ्या प्रवासात वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. रस्ता डांबरीकरण करण्यात आला असला तरी किरकोळ गोष्टीसाठी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे.  प्रत्येक वाहनच विरुद्ध बाजूने जात असल्याने वाहतुकीस होणारा हा अडथळा आणि धोका बांधकाम खात्याच्या लक्षात अजूनही कसा आलेला नाही याबाबतचा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे........... अकुलखेडे (ता चोपडा )खड्डे टाळण्यासाठी  वाहनांची होत असलेली गळाभेट

No comments