लंपीचा आजाराचा प्रादुर्भाव असल्याने रावेर तालुक्यात पोळा सण साधेपणाने मात्र हर्षोल्लासात साजरा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- ह...
लंपीचा आजाराचा प्रादुर्भाव असल्याने रावेर तालुक्यात पोळा सण साधेपणाने मात्र हर्षोल्लासात साजरा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेतकऱ्यांचा कष्टकरी साथी बैलांचा बैल पोळा सण सध्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे प्रशासनाच्या काळजी घेण्याचे आदेश तसेच पोळा सण स साध्या घरगुती पद्धतीन साजरा करण्याच्या आवाहनाला शेतकरी बांधवांनी प्रतिसाद देत उडासन आवश्यक त्या प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना व आदेशांच्या आधारे साधेपणाने मात्र मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. शेतकऱ्यांचा कष्टकरी साथी दैनंदिन शेतीकामात शेतकरी बांधवांना लाभत असलेले बैलांचे परिश्रमाचे आठवण म्हणून दरवर्षी
श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला पोळ्याच्या दिवशी नैवेद्य भरवून पूजा केली जाते. आदल्या या दिवशी म्हणजेच खानमैली च्या दिवशीच बैलांना जुपन न लावता भारमुक्त करुन शेतीची सर्व कामे बंद ठेवून बैलांना कुठलेही कष्ट न देता. सकाळी बैलांना स्नान घालून, शिंगावर रंगरंगोटी रंगीबेरंगी झुलरे,फुगे फुलांच्या माळा, मोरपिसे, गोंडस झगमगाटी सजावट करून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी बांधव एकमेकांना बैलजोडी पूजे साठी निमंत्रित केले जाते निमंत्रण घरी बैल पूजा करून पुरणपोळी, खीर यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य भरविण्यात आला. शेतकरी,सालगडी मोठ्या हौसेने पोळा फुटला नंतर बैल पळवायची पैज च लागते



No comments