adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रोखठोक महाराष्ट्र ग्रुपची नियमावली अखेर जाहीर :- रोखठोक महाराष्ट्र ग्रुप...!!

  रोखठोक महाराष्ट्र ग्रुपची नियमावली अखेर जाहीर :- रोखठोक महाराष्ट्र ग्रुप...!!   सौ. संगीता इनकर  (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.  (संपादक -:- ह...

 रोखठोक महाराष्ट्र ग्रुपची नियमावली अखेर जाहीर :- रोखठोक महाराष्ट्र ग्रुप...!! 


 सौ. संगीता इनकर  (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 नमस्कार... आपला रोखठोक महाराष्ट्र ग्रुप हा पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या चांगलाच चर्चेत ठरतोय ग्रुपमधील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच पत्रकारांचे रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या परिवाराकडूंन सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी स्वता: पत्रकार सौ. अनुजा कारखेले-देवरे मॅडम  पुणेकरांनीच ग्रुपवर येणाऱ्या मनोरंजन सृष्टींतील व्हिडिओमुळे ग्रुपवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने अखेर रोखठोक महाराष्ट्र ग्रुपने नियमावली पुढील प्रमाणे जाहीर केली आहे.

1) मनोरंजन व विश्रांती

प्रत्येक रविवारी ठराविक वेळेत ग्रुपवर केवळ मनोरंजनात्मक व्हिडिओ / मेसेजेस टाकता येतील.

मनोरंजनाचा हेतू हा केवळ थोडा विरंगुळा मिळावा असा असेल.

महिला पत्रकार बांधवांना अशा प्रकारच्या व्हिडिओंमध्ये रस नसेल, तर त्यांनी स्वतःहून निर्णय घेऊन ग्रुपमधून बाहेर पडले तरी काही हरकत नाही.

2) माहिती व बातम्या

एकाच बातमीचे वारंवार पुन्हा-पुन्हा शेअरिंग टाळावे.

फक्त सत्य, पडताळणी केलेली आणि प्रमाणित माहितीच शेअर करावी.

कोणत्याही प्रकारची खोटी, अफवाप्रकारची माहिती पसरवू नये.

3) शिस्त आणि जबाबदारी

ग्रुपवर कोणत्याही कारणास्तव कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन टाळावे.

कोणालाही व्यक्तिगत पातळीवर शिवीगाळ, अपमानास्पद, जाती-धर्मावर टीका करणारे किंवा राजकीय पक्षीय मतप्रदर्शन करणारे मेसेज पाठवू नयेत.

कोणत्याही सदस्याला दुसऱ्याच्या सांगण्यावरून ग्रुपमधून बाहेर काढले जाणार नाही.

4) ग्रुपचा उद्देश

ग्रुप हा पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी, पत्रकार व इतर मान्यवर सदस्यांमध्ये संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी आहे.

प्रशासनाशी संबंधित घडामोडींवर चर्चा करताना सन्मान आणि सभ्य भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे.

कोणत्याही वादग्रस्त राजकीय किंवा वैयक्तिक प्रचाराचे पोस्टिंग टाळावे.

5) ग्रुपची प्रतिष्ठा

आजपर्यंत रोखठोक महाराष्ट्र ग्रुप हा विविध जिल्ह्यांतील पत्रकार, अधिकारी व सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रशासनात चर्चेत आला आहे.

ही प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सर्व सदस्यांनी नियमांचे पालन करून ग्रुपची शिस्त राखावी.

पुढेही सर्व सदस्यांनी आपले प्रेम, सहकार्य आणि जबाबदारीने सहभाग ठेवावा ही विनंती.

👉 सदस्यांना अपेक्षित वर्तन :

आदरपूर्वक संवाद साधा.

माहिती, बातम्या किंवा मनोरंजन शेअर करताना ग्रुपच्या उद्देशाचा विसर पडू देऊ नका.

ग्रुपची ओळख "रोखठोक" असली तरी शिस्त, सन्मान आणि सौजन्य हेच आपले खरे ब्रीदवाक्य आहे.

📌 आपला,

रोखठोक महाराष्ट्र ग्रुप

📌 मार्गदर्शक / संपादक मंडळ

 संपादक मंगेश पवार पुणेकर संपादक महंमद शेख सांगलीकर, संपादक संतोष जी. लांडेपुणेकर, संपादक c.K. आण्णा मा. संभाजी पुरी गोसावी सातारकर, सौ. अनुजा कारखेले-देवरे मॅडम पुणेकर, सौ.आरती पाटील मॅडम जळगांवकर, सौ. संगीता इनकर मॅडम बीडकर

No comments