तेल्हारा तालुक्यामधील ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतपिकांचे पंचनामे करुन त्वरीत मदत मिळावी ; तहसीलदार यांना दिले निवेदन शामसुंदर सोनवणे वि...
तेल्हारा तालुक्यामधील ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतपिकांचे पंचनामे करुन त्वरीत मदत मिळावी ; तहसीलदार यांना दिले निवेदन
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा तालुक्यामध्ये दिनांक, 16-08-2025 ते 18-08-2025 पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतक-यांच्या शेतातील पिकांचे पुरामुळे व सकल भागात पाणी साचल्यामुळे खुप मोठे नुकसान झाले. तालुक्यातील काही गावात घरामध्ये पाणी शिरले त्यामध्ये सुध्दा शेतक-यांचे व सर्वसामान्याचे आर्थिक नुकसान झाले. आधीच शेतकरी कर्जामुळे संकटात सापडलेला आहे. त्यामध्ये हे सुनामी संकट शेतक-यांवर ओढले असुन त्वरीत शेताचे व घरांचे पंचनामे करुन त्वरीत शासकीय भरीव मदत देण्यात यावी करिता हि आपणास नम्र विनंती.
व सरसकट ५० टक्के नुकसान झालेले आहे असे नमूद करावे कारण एक पटवारीला दहा गाव आहेत आणि दहा गावाचा सर्वे करण्यासाठी कमीत कमी त्यांना 25 दिवस लागणार आहेत त्यामुळे आज झालेला नुकसान हे 25 दिवसानंतर दिसणार नाही म्हणून सरसकट 50% शेतकऱ्यांचे नुकसान दाखवून त्यांना मदत द्यावी..
अन्यथा या प्रकरणाची शासनाने दखल न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडुन तिव्र आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील.प्रहार जनशक्ति पक्ष अकोला
जिल्हा अध्यक्ष श्री कुलदीप पाटील वसु महासचिव श्री राजेश पाटील खारोडे प्रहार युवक अध्यक्ष श्री सुशिल पुंडकर यांचे मार्गदर्शनात प्रहार जनशक्ती पक्ष युवक उपजिल्हाप्रमुख श्री सुरज खारोडे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे, युवक तालुका अध्यक्ष प्रमोद तायड़े, शेतकरी आघाड़ी तालुका अध्यक्ष गोपाल घुंगऴ शहर प्रमुख भैय्या देशमुख प्रहार अपंग आघाडी कार्याध्यक्ष संदीप ताथोड, विक्की मल प्रदिप प्रार्थीकर मा ता.अध्यक्ष मुन्ना बिहाडे, कार्याध्यक्ष शंकर कडु, युवक संघटक गौरव अरबट, संतोष गिरे अपंग आघाड़ी तालुका अध्यक्ष शिवा कराऴे, अब्दूल शाफिक, सचिन खंडेराव, अजय खारोडे, रणविर काकडे अनंता बोर्डे राजेश वानखडे श्याम बोर्डे गणेश पानझडे उमेश कोरडे प्रमोद चव्हाण समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments