adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमोल बनसोडे साहेब: गरीबीतून उभे राहिलेले शेतकरी सेवक

  अमोल बनसोडे साहेब: गरीबीतून उभे राहिलेले शेतकरी सेवक  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्...

 अमोल बनसोडे साहेब: गरीबीतून उभे राहिलेले शेतकरी सेवक 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेला संग्रामपूर तालुका. ग्रामीण भाग असलेला या तालुक्यात शेती हाच जीवनाचा आधारस्तंभ आहे. या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या समस्यांना सोडवणारे अधिकारी आता फार दुर्मीळ झाले आहेत. परंतु याला अपवाद ठरले आहेत ते तत्कालीन तालुका कृषि अधिकारी श्री.अमोल बनसोडे.अशा या समर्पित व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना अमोल बनसोडे साहेबांची आठवण येते. संग्रामपूर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी म्हणून त्यांनी पाच वर्षे सलग शेतकरी जनतेची सेवा केली. त्यांच्या कार्याचा वारसा आजही शेतकऱ्यांच्या मनात जिवंत आहे. हा लेख त्यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकणारा आहे. ज्यामुळे त्यांच्या तत्कालीन कार्याला ताजेपणा लाभेल.गरीबीची पार्श्वभूमी लाभलेला आणि बालपणातील संघर्ष वाट्याला आलेले अमोल बनसोडे  हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रेवली या एका छोट्याशा खेड्या–गावातून येतात. त्यांचे हे मूळ गाव हे साधे व ग्रामीण वातावरण असलेले.जिथे शेती हा एकमेव व्यवसाय आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरी जेमतेम कोरडवाहू अत्यंत अल्प शेती.त्यावर घरचे पालन–पोषण भागत नव्हते.त्यामुळे त्यांचे आई-वडील दोघेही मजुरी करून कुटुंब चालवत असत.लहानपणीच अमोल हे आई-बाबांचा लाडका होते. पण गरीबीमुळे  बालपणातच त्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे मोठे ओझे पडले.कारण घरात ते थोरले होते.शाळेच्या सुट्टीच्या दिवशी ते आई-बाबांसोबत शेतात कष्ट करायचे. प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करत. काही काळ ते आई वडिलांसोबत ऊसतोडणी व शेतमजुरीसाठी स्थलांतरित सुद्धा झाले.शेतातील कष्ट त्यांनी स्वतः अनुभवले होते.शेतकऱ्यांचे दुःख त्, त्यांची दैना त्यांनी जवळून पाहिली आहे.शेतकऱ्यांची ही गरीबी त्यांच्या जीवनाची शाळा ठरली. तीच गरीबी आज त्यांना 'मीठी श्रीमंती‘ (मिठाई सारखी गोड) झाली आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती नसावे. कारण त्यांच्या या पार्श्वभूमीमुळे ते शेतकऱ्यांच्या दुःख-दर्शनांना आत्मीयतेने समजू शकले आणि त्यांच्यासाठी त्यांनी त्यांची सेवा दिली.शिक्षणातही संघर्ष होताच. गरीबीमुळे उच्च शिक्षण घेणे कठीण होते, पण ते वसतिगृहात राहून दहावी पास झाले.पुढे बारावी सुद्धा वसतिगृहात राहून पूर्ण केली.पुढे शाहूनगरी कोल्हापूर येथे त्यांनी त्यांचे कृषी क्षेत्रात पदवी प्राप्त केली . पदव्युत्तर शिक्षण त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथून पूर्ण केले.ही त्यांची पदवी केवळ कागदावरच राहिली नाही, तर ती शेतकऱ्यांच्या सेवेचे साधन ठरली. त्यांच्या बालपणातील शेतीचे अनुभव व गरिबी हे त्यांच्या अधिकाऱ्याच्या कारकीर्दीचे आधारस्तंभ ठरले.संग्रामपूर तालुक्यातील त्यांची समर्पित सेवा आदर्श ठरली.संग्रामपूर तालुका हा बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचा सातपुड्याच्या कुशीत वसलेला आदिवासी बहुल तालुका.जिथे शेतकरी विविध समस्यांना तोंड देतात. पाण्याची टंचाई, बियाणे-खते महागाई, रिक्त पदांचे ग्रहण इ. . येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून अमोल बनसोडे साहेबांनी सतत पाच वर्षे (2020–2025) सेवा केली. त्यांच्या मनात कधीच जात–पात , उच–नीच , गरीब–श्रीमंत असा भेदभाव कधीच नव्हता.प्रत्येक शेतकरी त्यांच्यासाठी समान होता. फक्त शेतकरी हीच "एकमेव जात" त्यांनी पाहिली.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असत.काही कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त असत, पण अमोल साहेबांच्या कक्षेत (कॅबिनमध्ये) आल्यावर समस्या सोडवली जात असे. ते शांत बसत नव्हते; समस्येचे निराकरण होईपर्यंत ते प्रयत्न करत राहत. जरी ते अधिकारी असले तरी, त्यांच्या रक्तात क्रांतिकारकांचा वारसा होता. छत्रपती शिवाजी महाराज फुले-शाहु-आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या सेवाभावात दिसत होता. ते केवळ कागदोपत्री काम करत नव्हते तर प्रत्यक्ष शेतात जाऊन ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत. बियाणे वाटप, खतसुविधा, पीक विमा योजना इ.सर्व काही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत. त्यांच्या या कार्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आजही त्यांचा आभारी आहे.जनतेच्या हृदयातील स्थान आणि विदाई अमोल बनसोडे साहेबांच्या या समर्पित सेवेमुळे ते शेतकऱ्यांच्या हृदयात घर करून गेले. ते अधिकारी नव्हते, तर ते प्रत्येकासोबत मित्र-सहकारी सारखे वागत. त्यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले, ज्यामुळे उत्पादन वाढले आणि आर्थिक स्थिती सुधारली. उदाहरणार्थ संत्रा, केळी फळबाग लागवड. पण दुर्दैवाने, त्यांची बदली झाली व ते संग्रामपूर तालुका सोडून त्यांना तीन महिने झाले. आजही तालुक्यात त्यांची उणीव भासते. शेतकरी म्हणतात, "बनसोडे साहेब गेले की, आमच्या समस्या कोण सोडवेल?" ही उणीव त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.त्यांच्या विदाईनंतरही, त्यांचा वारसा कायम आहे. ते आता कुठेही असतील, पण संग्रामपूरच्या शेतकऱ्यांसाठी ते नेहमीच प्रेरणास्रोत राहतील. गरीबीतून उभे राहिलेले हे शेतकरी जनसेवक हे दाखवतात की, सेवा ही पदाची नाही, तर हृदयाची असते.

समारोप: एक खरा सेवक अमोल बनसोडे साहेब हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांच्या जीवनकथेतून आपल्याला शिकायला मिळते की, गरीबी ही अडथळा नाही, तर प्रेरणा असू शकते. गरिबीचे भांडवल न करता यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले.त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा वारसा जोपासत, ते जनतेची सेवा करत राहिले. आज संग्रामपूर तालुक्यात अशा अधिकाऱ्यांची गरज आहे.

No comments