💦 नाभिक समाज बांधवांसाठी गट विमा योजना 💦 जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
💦नाभिक समाज बांधवांसाठी गट विमा योजना 💦
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर शहरातील सर्व सलून व्यवसाय करणाऱ्या दुकानदार, चालक व मालक बांधवांसाठी जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने गट विमा काढण्यात येत आहे.
⏩ या उपक्रमाचे वैशिष्ट्य:
✅ महाराष्ट्रातील पहिल्यांदाच नाभिक समाजासाठी गट विमा योजना
✅ प्रथम टप्प्यात शिरपूर शहरातील 300 दुकानदार, चालक व मालक यांचा समावेश
✅ पुढील टप्प्यात शिरपूर तालुका व संपूर्ण धुळे जिल्हा.
✅ वार्षिक फक्त ₹251 सभासद शुल्क
📋 आवश्यक कागदपत्रे:
१) आधार कार्ड
२) मतदान ओळखपत्र
३) रेशन कार्ड
४) दोन पासपोर्ट साईज फोटो
५) वारसदाराचे नाव
📍 कागदपत्र जमा करण्याचे ठिकाण:
राज मेन्स पार्लर, करवंद नाका, शिरपूर
🌟 योजनेमागील हेतू:
समाजातील एखाद्या कुटुंबप्रमुखाचे अचानक निधन झाल्यास त्या कुटुंबावर मोठे संकट येते. अशा वेळी या गट विमा योजनेमधून २ लाख रपये आर्थिक मदत दिली जाईल.हा उपक्रम राजकारणापलीकडे जाऊन समाजहितासाठी राबवला जात आहे. कृपया सर्वांनी यामध्ये भाग घेऊन सभासद व्हावे.
📞 संपर्क करा-
विकास सेन (संस्थापक अध्यक्ष) – 📱 8888678933
श्री.रामचंद्र येशी (उपाध्यक्ष) – 📱 8261968982
ही योजना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहे. कृपया याचा लाभ घ्या आणि इतर बांधवांनाही सहभागी करून घ्या.
आतापर्यंत जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने शहरांमध्ये व तालुक्यात दैदीप्यमान असे कार्य करण्यात आलेले आहे त्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोर्ड देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक सांगवी पोलीस स्टेशनला 60000 फलक देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील नावाजलेला व गाजलेला भाग म्हणजे करवंद नाक्यावर संत सेनाजी महाराज यांचे फलक अनावरण प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येऊन न भूतो न भविष्यती असे कार्य झालेले आहे.
गटविमा काढण्यामागचे कारण असे की, मराठ गल्लीमध्ये प्रमोद खोंडे या आपल्या समाज बांधवांच निधन झाले .त्यांच्या अंत्ययात्रेला व दशक्रिया विधीला आपल्या समाजातील ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.जगदीश दादा सोनगडे व राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी दहा-पंधरा हजार रुपये गोळा करून अंत्यविधी व दशक्रियाविधीचा कार्यक्रम होण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना दिले. त्यावेळेस माणुसकीच्या नात्याने खूपच वाईट वाटले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर मागे कुटुंबाचे हाल होऊ नये ही शुद्ध भावना लक्षात घेऊन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त कुटुंबाला गटविमाच्या माध्यमातून दोन लाख रुपये मदत मिळेल यासाठीच हा सर्व खटाटोप आहे. लवकरच या कार्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी आपण येत्या पंधरा दिवसात शिरपूर शहरातील सर्व दुकानदार चालक-मालक समाज बांधवांची मिटिंग लावणार आहोत. यात सर्व चालक-मालक समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
श्री.रामचंद्र येशी :- उपाध्यक्ष जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान
श्री.विकास सेन :- संस्थापक अध्यक्ष जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान

No comments