खडसे महाविद्यालयात "वैदिक मॅथेमॅटिक्स" विषयावर व्याख्यान संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) म...
खडसे महाविद्यालयात "वैदिक मॅथेमॅटिक्स" विषयावर व्याख्यान संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन संचलित श्रीमती जी .जी. खडसे महाविद्यालयात दिनांक 8 सप्टेंबर रोजी गणित विभागाद्वारे "वैदिक मॅथेमॅटिक्स " या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. रंजना झिंजोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रा. झिंजोरे मॅडम यांनी वैदिक मॅथेमॅटिक्स मधील वेगवेगळ्या ट्रिक्स उदाहरणादाखल सोप्या भाषेत समजावून सांगितल्या व विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. सदर क्लुप्त्या एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी सारख्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्याने आत्मसात करून यश संपादन करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस. एम. पाटील (गणित विभाग प्रमुख) यांनी केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समीक्षा पाटील हिने तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी वैष्णवी बऱ्हाटे या विद्यार्थिनींनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी गणित विभागाचे विद्यार्थी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणित विषयाच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments