adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिकअप जितो तसेच मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

  पिकअप जितो तसेच मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. लाखोंचा मुद्देमाल हस्तगत   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...

 पिकअप जितो तसेच मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. लाखोंचा मुद्देमाल हस्तगत  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.९):-एमआयडीसी पोलीस ठाणे हददीतुन महिंद्रा पिकअप,जितो,तसेच मोटारसायकल चोरी करणा-या गुन्हेगारास पोलिसांनी अटक करत तब्बल ७ लाख ६०,०००/- रुपयाचा मुददेमाल हस्तगत करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी नामे मंगल किशोर शिंदे (वय ३४, धंदा ट्रान्सपोर्ट,रा.प्लॉट नं.आर एम २१/२२,एलटी कॉलनी, चव्हाण शाळेपाठीमागे, एमआयडीसी,अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की,नेहमी प्रमाणे आमची महिंद्रा पिकअप नं. एम एच १६ ए वाय ९६५४ हि कंपनी मध्ये जावुन रात्री ०७/३० वा सुमारास आमचे घरासमोरच पार्क केली तसेच त्या शेजारी इतर दोन पिकअप पार्क होत्या व त्यानंतर मी जेवन करुन रात्रीच्या सुमारास झोपी गेले त्योवळी सर्व पिकअप या पार्क केलेल्या मी पाहील्या होत्या त्यानंतर दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री मला बाहेर गाडी चालु झाल्याचा आवाज आल्याने मला शंका आली त्यानंतर मी बाहेर येवुन पाहीली असता बाहेर तीन पिकअप पैकी एक महेंद्रा पिकअप नं. एम एच १६ ए वाय ९६५४ पार्किंग केलेल्या ठिकाणी दिसली नाही तेव्हा आम्ही तीचा आजुबाजुस शोध घेतला असता ती मिळून आली नाही तेव्हा आमची खात्री झाली कि आमची ५,००,०००/-रु (पाच लाख रुपये) किमतीवची महिंद्रा पिकअप नं. एम एच १६ ए वाय ९६५४ हि कोणीतरी अज्ञत चोरट्याने चोरुन नेल्याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुरजि नंबर ६९६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गु रजि दाखल करण्यात आला आहे.या गुन्हयाचा तपास करीत असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा प्रणव नितीन पठारे, (रा.देवळाली प्रवरा ता. राहुरी) याने त्याचे साथीदारामार्फत केला असुन तो गुन्हयातील मुददेमालासह मनमाड रोड,विळद बायपास जवळील पेट्रोल पंपाचे समोरील डोंगरा जवळ येणार असुन आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्त बातमी मिळाल्याने दोन पंचासह व पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे प्रणव निती पठारे वय-१९ वर्ष नगरपालिके समारे देवळाली प्रवरा ता राहुरी जि अहिल्यानगर व त्याचे दोन साथीदार विधीसंर्घषग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदर गुन्हयातबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शानाखाली सपोनि.माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ. संदीप पवार,पोहेकॉ.सचिन आडबल,पोहेकॉ.राजु सुद्रीक, पोकॉ.किशोर जाधव,पोकॉ. नवनाथ दहिफळे,पोकॉ.ज्ञानेश्वर आघाव तसेच दक्षिण मोबाईल सेल अहिल्यानगर चे पोकॉ. राहुल गुंडु 

No comments