adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"जागतिक तापमान वाढ" या विषयावर यावल महाविद्यालयात व्याख्यान संपन्न -

 "जागतिक तापमान वाढ" या विषयावर यावल महाविद्यालयात व्याख्यान संपन्न   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल...

 "जागतिक तापमान वाढ" या विषयावर यावल महाविद्यालयात व्याख्यान संपन्न  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत प्रा.अर्जुन ए.गाढे यांच्या व्याख्यानाने सहावे पुष्प गुंफण्यात आले.जागतिक तापमान वाढ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी उपप्राचार्य एम.डी.खैरनार हे अध्यक्ष म्हणून तर उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रा.गाढे यांनी आपल्या व्याख्यानात जागतिक तापमान वाढीची समस्या सर्व जगाला भेडसावत आहे.जागतिक तापमानातील वाढ ही औद्योगिकीकरण,वाढत जाणारी वाहनांची संख्या, शेतीमधील जाळपोळ, वाढता घरगुती फ्रीज व एसी यांचा वापर, मोठया प्रमाणावरील वृक्षतोड वगैरे कारणांमुळे होत आहे तर यावर उपाय म्हणून सर्वत्र मोठया प्रमाणावर वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले पाहिजे असे सांगितले.तसेच उपप्राचार्य एम.डी.खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जागतिक तापमान वाढ हा विषय अतिशय महत्वाचा असून तो मानवी जीवनाशी संबंधित आहे.हा विषय गंभीर असून जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर सर्वच देश प्रयत्न करीत आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले तर आभार प्रा.सी.टी.वसावे यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक उपस्थित होते.

No comments