बेरड रामोशी समाजाच्या वतीने आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी. लातूर जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ज्यांन...
बेरड रामोशी समाजाच्या वतीने आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी.
लातूर जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून स्वबळावर सशस्त्र लढा दिला, स्वतः चे सैन्य बळ निर्माण केले, पेशवाई संपल्यावर ही समाजाच्या प्रगती साठी स्वातंत्र्य आवश्यक आहे या ध्येया ने प्रेरित होऊन सतत कार्यरत रहाणारे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या वतीने लातूरात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भटक्या विमुक्तांचे नेते प्रा सुधीर अनवले उपस्थित होते. उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्या नंतर त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. रणजित घावीट यांनी ही समयोचित विचार मांडले. ऋषी भैया पाटील, मारोती झाकने, यशवंत
पवार , नागनाथ जाधव, उमाजी मदने, खंडू जाधव, साधू चव्हाण, अमित मसुगडे,बालाजी सुरवसे, लक्ष्मण चव्हाण, सुखदेव बेरड, अरूण जाधव, सोमनाथ मसुगडे, भास्कर मंडले, सिध्देश्वर जाधव, लक्ष्मण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आज बेरड रामोशी समाज गरीबी चे जीवन जगत आहे. समाज संघटित होऊन भटक्या विमुक्तांच्या व्यापक चळवळी चा भाग बनला पाहिजे.तरच आपल्याला पुढील दिशा दिसेल. फुले-आंबेडकरी विचारधारा च बेरड रामोशी समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाईल असे मत भटक्या विमुक्तांचे नेते प्रा सुधीर अनवले यांनी यावेळी मांडले.

No comments