अक्षय काठोके पत्रकारीता विभागात प्रथम मुक्ताईनगरात पत्रकारांकडून सत्कार मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) उत्...
अक्षय काठोके पत्रकारीता विभागात प्रथम मुक्ताईनगरात पत्रकारांकडून सत्कार
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनरलीझम (पत्रकारिता) विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे अक्षय काठोके यांचा मुक्ताईनगर शहरातील पत्रकार बांधवांनी नुकताच सत्कार केला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.. या सत्कार कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांनी आपली उपस्थिती दर्शवत अक्षय यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासात उत्तुंग कामगिरी करत अक्षय काठोके यांनी विद्यापीठात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या यशामुळे मुक्ताईनगर शहराचा अभिमान वाढला आहे
कार्यक्रमात बोलताना उपस्थित पत्रकारांनी म्हटले की, "अक्षय यांच्यासारख्या तरुणांनी पत्रकारिता क्षेत्रात पुढे येणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या जिद्द, मेहनत व चिकाटीमुळे हे यश मिळाले असून,भविष्यात ते एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून उभे राहतील, अशी आमची अपेक्षा आहे."

No comments