खडसे महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक संच दुरुस्ती व देखभाल प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत...
खडसे महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक संच दुरुस्ती व देखभाल प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागात दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी “इलेक्ट्रॉनिक संच दुरुस्ती व देखभाल प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध इलेक्ट्रॉनिक किट्स, त्यांचे घटक, छापील सर्किट बोर्ड (PCB), मल्टीमीटरचा वापर तसेच दुरुस्ती व देखभाल याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना स्वतः प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला व तांत्रिक कौशल्ये विकसित झाली.
या कार्यशाळेत एकूण २५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत काम करताना विविध समस्या सोडवण्याचा सराव केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अनुभवाधारित (Experiential) शिक्षण हा शिक्षणातील महत्त्वाचा घटक आहे. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव लाभला आणि त्यांचे शैक्षणिक ज्ञान अधिक दृढ झाले. या कार्यशाळेचे कौशल्यपूर्ण संचालन प्रा. यू. एन. इंगळे आणि प्रा. डॉ. ताहिरा मीर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक संच दुरुस्ती व देखभालीसंबंधी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य साळवे यांनी कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी नेहमीच अशा उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या कार्यशाळेचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन व उपप्राचार्य प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी केले.
No comments