सायबर गुन्ह्यांवर प्रभावी उपाय.. न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये सायबर पोलीस स्टेशनकडून अव्हरनेस मार्गदर्शन सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...
सायबर गुन्ह्यांवर प्रभावी उपाय.. न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये सायबर पोलीस स्टेशनकडून अव्हरनेस मार्गदर्शन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलबुर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली दि. 29/9/2025 रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड कॉलेज,लालटाकी, अहिल्यानगर येथे सायबर अव्हरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात 11 वी ते 12 वीचे सायन्स,कॉमर्स,आर्ट्स शाखेतील एकूण 580 विद्यार्थी,80 विद्यार्थ्यांचे पालक तसेच प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे,उपप्राचार्य श्रीमती के.एन.दारकुंडे,प्रा.डॉ. श्रीमती.प्रतीमा शेळके,प्रा.डॉ. दत्तात्रय नकुलवाड,प्रोफेसर अनिल आठरे,श्रीमती.जोगदंड मॅडम,प्रोफेसर श्री.फसले सर, प्रोफेसर श्री.गोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम श्री.सुदाम काकडे,पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना डिजिटल अरेस्ट, मोबाईल हॅकिंग,फेक अकाउंट तयार करणे,आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे तपासाची पद्धत, आरोपींना पकडण्याच्या पद्धती तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत येणारे गुन्हे,शिक्षा व द्रव्यदंड याबाबत सविस्तर माहिती दिली.यानंतर पोलीस नाईक अभिजीत अरकल यांनी पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,बँक डिटेल्स, ओटीपी शेअर न करणे, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे होणारे फसवे प्रकार,बँकेच्या नावाने येणाऱ्या एपीके लिंक फाईल्स,लॉटरीचे खोटे कॉल्स, शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी फसवणूक, व्हिडीओ शेअरिंग,फेक वेबसाईट, मोबाईल हॅकिंग,पासवर्ड व सुरक्षा अपडेट ठेवणे,अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट न करणे, कोणत्याही लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर न करणे,एनीडेस्क व टीमव्ह्युअर सारखी अॅप्स डाउनलोड न करणे,नायजेरियन फ्रॉड यांसारख्या विविध फसवणुकीच्या प्रकारांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान माहिती अधिकार दिनानिमित्त मोबाईलचा वापर चांगला की वाईट यावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रतीक लोंढे व कैवल्य गोल्हार यांनी विजेतेपद मिळवले. त्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे,पोलीस उपनिरीक्षक श्री.सुदाम काकडे व पोलीस नाईक अभिजीत अरकल यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.सायबर अव्हरनेस कार्यक्रमात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी डिजिटल अरेस्ट, युपीआय व्यवहार,ऑनलाइन व्यवहार, वेबसाईट, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल,नायजेरियन फ्रॉड, व्हॉट्सअॅप हॅकिंग आदींबाबत प्रश्न विचारले.त्यांची सविस्तर उत्तरे देऊन शंका निरसन करण्यात आले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थी, प्राध्यापक व उपस्थित सर्वजण समाधानी झाले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक श्रीमती जोगदंड मॅडम व प्रोफेसर फसले सर यांनी विशेष पुढाकार घेतला. त्याबद्दल श्री. सुदाम काकडे सर यांनी प्राचार्य व कॉलेजचे विशेष आभार मानले. प्रा.डॉ.दत्तात्रय नकुलवाड यांनी सायबर पोलीस स्टेशनचे आभार मानले.नमु्द सायबर अव्हरनेस कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मोरेश्वर पेंदाम पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर,श्री.सुदाम काकडे पोलीस उपनिरीक्षक,पोलीस नाईक अभिजीत अरकल,सफो मोहम्मद शेख आदींच्या प्रयत्नांतून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
No comments