सर्वधर्म एकता रॅली ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद: सुमय्या अली अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक-:- हेमकांत गायकवाड) अकोला:- सर्व धर्म एकता भव्य...
सर्वधर्म एकता रॅली ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद: सुमय्या अली
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
अकोला:- सर्व धर्म एकता भव्य रॅलीचे आयोजन नारीशक्ती सेवा फाऊंडेशनच्या कार्यालय येथून करण्यात आले होते ही रॅली उत्तर प्रदेशच्या कानपूर मध्ये घडलेली घटनेचा निषेध करण्याकरिता जातीय सलोखा व एकता कायम राहावे याकरिता काढण्यात आली होती या रॅलीत महिला व पुरुषांनी सायक्लोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली या रॅलीला संबोधित करताना सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारीशक्ती सेवा फाउंडेशन यांनी कानपूर मध्ये आय लव मोहम्मद च्या बॅनर वरून काही लोकान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा निषेध करत पुढे म्हणाल्या की संविधानाने सर्व जातीय धर्मा च्या लोकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे अधिकार दिलेले आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या धर्माच्या अनुसार आपले जीवन जगू शकतो आपल्या धर्माचा पालन करताना जर सरकार आणि प्रशासन त्यांच्यावर कार्यवाही करत असेल तर ते एकदम चुकीचे असून संविधान विरोधी आहे करिता सर्व जातीय धर्माचे लोकांनी व प्रशासननी एकमेकांच्या धर्माचे मान सन्मान करणे अत्यंत गरजेचे आहे या रॅलीमध्ये सर्व जातीय धर्माच्या लोकांनी मोठ्या संख्या आपली उपस्थिती दर्शवली ही रॅली एकतेचा प्रतीक चा मेसेज देणारी होती यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मौलाना अबुल कलाम आझाद यांची प्रतिमा हातात घेऊन तसेच भारत देशाचा तिरंगा हातात घेऊन महिलांनी पुढाकार घेतला संपूर्ण भारत देशात हिंदू मुस्लिम एकता जातीय सलोखा व भाईचारा कायम राहावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये महिला पुरुष व मुलांनी सायकलच्या संख्येत सहभाग घेतला यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता शेवटी सुमय्या अली म्हणाल्या की पोलीस प्रशासनाने चांगल्या काम करणाऱ्या लोकांना असे सहकार्य करावे तसेच पोलीस प्रशासन च्या दिशा निर्देशाला जनतेने सुद्धा मान्य करावे जेणेकरून पोलीस आणि पब्लिकचे संबंध आणखी चांगले होईल
No comments