यावल येथे स्मार्ट मीटर च्या अवाजवी बिलांमुळे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंताला घेराव. जबरदस्ती स्मार्ट मिटर बसवू देणार नाह...
यावल येथे स्मार्ट मीटर च्या अवाजवी बिलांमुळे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंताला घेराव.
जबरदस्ती स्मार्ट मिटर बसवू देणार नाही :माजी नगराध्यक्ष अतुल पाटील
भरत कोळी यावल ता प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : शहरातील वाणी गल्लीत असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील सह नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. शहरात नव्याने बसवलेले स्मार्ट मीटर मुळे सर्वसामान्य नागरीकांना अवाजवी आलेल्या बिल बाबत संताप व्यक्त करण्यात आला. तात्काळ स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवण्यात यावी अशी मागणी केली. स्मार्ट मिटरच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा याहूनही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान स्मार्ट मीटरची तपासणी केली जाईल अशी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
शहरातील वाणी गल्लीत राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरचे अवाजवी आलेले बिल घेऊन मोठ्या संख्येत नागरिकांनी आंदोलन केले. व उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांना घेराव घातला. अनेकांनी आपले जुने व नवीन वीज बिल या ठिकाणी त्यांच्यासमोर सादर केले व त्यांना निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की, शहरात दोन-तीन महिन्यापासून नवीन स्मार्ट मीटर विद्युत वितरण कंपनीमार्फत बसवले गेले आहे हे स्मार्ट मीटर जास्त फिरत असून त्यामुळे शहरातील नागरिकांना वीज बिले हे जास्तीचे येत आहे अवाजवी वीज बिले येत आहे कमी वापर करूनही मोठ्या प्रमाणावर बिल आले आहेत और तसेच मोठ्या प्रमाणावर आलेले बिल सर्वसामान्य ग्राहक भरू शकत नाही सदर स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी असल्यामुळे सदर स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे जुनेच मीटर लावण्यात यावे अशी मागणी आहे तसेच आलेले बिल यांच्या संदर्भात देखील तात्काळ मीटर तपासणी करून करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली सदर निवेदन देते प्रसंगी भरत भोई, जुगल घारू, सागर कोळी,नरेंद्र शिंदे, गोलू माळी, कृष्णा चौधरी, राहुल कचरे सह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.
No comments