adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किसान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

 किसान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा   पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा येथील किसान महाविद्यालयात...

 किसान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा  


पारोळा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा येथील किसान महाविद्यालयात दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी रासेयो स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय. व्ही .पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे आणि डॉ. डी. बी. साळुंखे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व स्वंयसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे परिसर झाडुन स्वच्छ  केले. त्यानंतर रासेयो स्थापना दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी केले. या प्रसंगी म. गांधीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मार्गदर्शनपर मनोगतातून प्रा. एस. एम. सुर्यवंशी यांनी रासेयो एकक स्थापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला तर उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे यांनी स्वच्छतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. पारोळा तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार अनिल पाटील आणि मंडल अधिक शेखर तडवी यांनी विद्यार्थ्यांना तहसिल कार्यालयातून मिळणारे विविध दाखले आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे याबाबत जाणीव जागृतीपर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील यांनी रासेयो युनिटची सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान यावर विचार मांडलेत.  कार्यक्रमाच्या सांगता समारोपात  स्वयंसेवकांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात  वृक्षारोपण करण्यात आले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वंयसेवक विद्यार्थी मनिष महाजन तर आभार रूपाली पाटील या विद्यार्थीनीने मांडलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी  नियोजन केले. कार्यक्रमास सर्व स्वंयसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments