adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कैकाडी,पामलौर,कुचिंकोरवी समुहाला राज्यात दुय्यम वागणूक...

  कैकाडी,पामलौर,कुचिंकोरवी  समुहाला राज्यात दुय्यम वागणूक...   समाजाचे सन्मानिय अध्यक्ष व सरपंच व्यासपीठावर उपस्थित होते. सोलापूर प्रतिनिधी....

 कैकाडी,पामलौर,कुचिंकोरवी  समुहाला राज्यात दुय्यम वागणूक...  

समाजाचे सन्मानिय अध्यक्ष व सरपंच व्यासपीठावर उपस्थित होते.

सोलापूर प्रतिनिधी...

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कैकाडी व कैकाडी समाजातील उप जातीना महाराष्ट्र राज्यात दोन वेळ वेगळ्या ठिकाणी आरक्षण लागू असून एकीकडे म्हणजेच विदर्भात कैकाडी समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गा मध्ये येतो तर उर्वरित महाराष्ट्रात कैकाडी समाज हा भटक्या विमुक्त जमाती, ( व्ही. जे. एन. टी. ) मध्ये येतोय उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजावर संपूर्णतः अन्याय कारक कायदा आहे कैकाडी समाज हा इतर अनुसूचित जाती प्रवर्गातील जातीं सोबत रोटी बेटी व्यवहार हा गेल्या अनेक वर्षा पासून होत आलेला आहे 


 केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाने ज्या पध्दतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण दिले. त्याच धर्तीवर आपल्या समाजाला सुध्दा हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण देण्याकरीता केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारला भाग पाडण्यासाठी 

 संपूर्ण कैकाडी पामलोर, कुचिंकोरवी समाजला हा S T प्रवर्गात मध्ये समाविष्ट करण्यात यावे या करीता सोलापूर शहर जिल्हा कैकाडी,पामलोर, कुचिंकोरवी समाजाच्या वतीने वरील मागणीसाठी अंदोलनाचे दिशा ठरविण्या साठी आज दिनांक 24/9/2025 रोजी वेळ 11:00 वा सोलापूर पार्क स्टेडियम जवळ फडकुले सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती 

या बैठकीत वरील समाजाचे अध्यक्ष,   सरपंच, युवक अध्यक्ष,समाजाचे मा नगरसेवक सह सेटलमेंट,बाळीवेस, अशोक चौक,अक्कलकोटसह जिल्ह्य़ातील समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थिती मांडली होती संबंधित समाजाच्या बैठकीत एकमताने दि.23/10/2025 रोजी मोठ्या प्रमाणावर समाज बांधवसह महीला वर्ग,युवक,जेष्ठ नागरिक सह समाजातील प्रत्येक घटक या होणाऱ्या अंदोलनात सहभाग करण्याचे मानस ठेवले आहे. तसेच 25 जणांचे एक समिती असेल त्या समितीत 1) कैकाडी समाज चे 5 जण अभ्यासु व जेष्ठ सदस्य असेल त्याच प्रमाणे 2) पामलोर समाजाचे 5 जण अभ्यासु व जेष्ठ सदस्य असेल 3) कुचिंकोरवी समाजाचे 5 जण अभ्यासु व जेष्ठ सदस्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. 5 सदस्यांचे निवड त्या त्या समाज चे अध्यक्ष, सरपंच निवडण्याचे अधिकार दिले आहे 

तसेच 7 जणाचे वरील समाजातील समाज बांधव समाविष्ट असेल अभ्यासक व आपल्या समाजा बाबत माहीतीगार जेष्ठ समाज बाधवांचे एक वेगळी 7 जणांचे टीम असेल असे या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहे.  तरी सर्व समाज बाधवांना आव्हान आहे की दिनांक 23/10/2025 रोजी अंदोलनात सहभाग घेऊन सोलापूर शहर जिल्हा चक्का जाम अंदोलन करावे लागेल तसेच आपले ताकद राज्यकर्त्यांसह सरकारला दाखवल्या शिवाय पर्याय नाही....  

आज नाही तर कधीच नाही एवढे लक्षात ठेवा...

पत्रकार:- राम (कैकाडी) गायकवाड

No comments