adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

त्या धार्मिक शोभायात्रा मार्गावरील कचरा संकलन करणाऱ्या १४ तरुणांचा सत्कार..!

 त्या धार्मिक शोभायात्रा मार्गावरील कचरा संकलन करणाऱ्या १४ तरुणांचा सत्कार..!  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  रा...

 त्या धार्मिक शोभायात्रा मार्गावरील कचरा संकलन करणाऱ्या १४ तरुणांचा सत्कार..! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील सावदा शहरात सालाबादप्रमाणे सुन्नी पंथीय मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा केला.त्यावेळी शहरात निघालेली भव्य शोभायात्रेत या गरीब नवाज जनसेवा गृप सावदा तर्फे स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली होती. 


तरी 
एक मालवाहू पिक्प रिक्षा व अस्वच्छता दुर करण्यासाठी आवश्यक साहित्य हातात घेऊन या जनसेवा गृपच्या एकूण १४ सदस्यांनी मिरवणूक मार्गावरील कचरा,प्लास्टीक पिशव्या सह इतर टाकाऊ वस्तू उचलून,या रिक्षात टाकण्याचे कौतुकास्पद कार्य करुन त्यांनी नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.तसेच यात विशेष असे की,सदर जनसेवा गृप दररोज शहरातील विविध रुग्णालयात गरजू रुग्णांना स्वत:च्या खर्चाने जेवणाचे डबे मोफत देण्याचे चांगले कार्य सुध्दा करतात.

*प्रोत्साहन सत्कार कार्यक्रम*

या गरीब नवाज जनसेवा गृपच्या अशा कार्याची महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी तथा पत्रकार युसूफ शाह,फरीद शेख व मोईन लाला गृप यांनी दखल घेऊन दि.१० सप्टेंबर रोजी चॉंदीनी चौक भागात सरकार सादिक शाह वली दर्गा परिसरात एक छोटेखानी प्रोत्साहन सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.या ठिकाणी जनसेवा गृपचे सैय्यद अजहर सर,जावीद जनाब,शेख वसीम,शेख अल्ताफ,इम्रान पिंजारी,शेख सलमान,शेख राजू,शेख अज्जू,जुबैर खान,शेख फारुख,शेख अकील,जुनैद खान, इरफान मोमिन,इब्राहिम बेग अशा एकूण १४ संदस्यांसह नुकतेच(आयटीआय)मध्ये ८६% टक्के गुण प्राप्त करणारे उमर फारुख शेख कलीम या विद्यार्थीचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमात प्रमुख अतिथि सावदा न.पा.आरोग्य अधिकारी वसंत राठोड,कार्यक्रम अध्यक्ष सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर वसीम खान,केळी उद्योजक शेर खान या मन्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सादीक मिस्तरी,माजी मुख्याध्यापक अय्युब सर,भिकन सेठ,शहिद अब्दुल हमीद स्मारक संस्थाचे अध्यक्ष शेख मुख्तार,नविन कब्रस्ताना कमिटीचे अध्यक्ष कलिम जनाब,पत्रकार अजहर खान,मुजम्मील मेडिकल,अजगर बावा,शौकत खान,मलक समद,शेख अलिम, शेख मोहसीन,शेख शाहीद,शेख आदिल,शोहेब खान उर्फ टोया,शेख एजाज,शेख राजा,हारुन हैरा कव्वाल,शेख अंनिस पिंजारी,शेख अदनान,शोहेब खान,पप्पु बीएलसी,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार फरीद शेख तर आभारप्रदर्शन युसूफ शाह यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोईन लाला गृप यांनी परिश्रम घेतले.

No comments