आदिवासी तडवी भिल्ल अरसलान ची स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लहान मुलां...
आदिवासी तडवी भिल्ल अरसलान ची स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लहान मुलांची यूपीएससी म्हणून गणल्या जाणाऱ्या AISSEE 2025 अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षे अंतर्गत मेरिट नुसार पोदार इंटरनॅशनल स्कुल, भुसावळ च्या अरसलान अशफाक तडवी ची निवड भारतातील अग्रगण्य आणि अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेल्या सैनिक शाळा, चंद्रपूर येथे झाली आहे. अरसलान अगोदर पासूनच अभ्यासात व विविध उपक्रमांत पुढे राहायचा आणि शाळेतील दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत येत असे. याअगोदर त्याने भारत सरकार शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, ऑलिम्पियाड परीक्षेत ही यश मिळवले आहे. विविध परिक्षेत पास होण्याची परंपरा कायम राखत तो आता सैनिक शाळा परीक्षेतही पुढे राहिला. तसेच त्याने आदिवासी तडवी भिल्ल समाजातून ही परीक्षा पास होण्याचा पहिला बहुमान मिळवला. त्याच्या या यशासाठी त्याची आई आयेशा अशफाक तडवी, रश्मी मॅम नवनाथ देशमुख सर, पोदार इंटरनॅशनल स्कूल भुसावळ च्या सिमरन मॅडम, हर्षल मॅडम आणि प्राचार्य श्री सचिन बनसोडे सर यांनी मार्गदर्शन केले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच वडील अशफाक जरदार तडवी, आजोबा जरदार सरदार तडवी, भाऊ अरहान अशफाक तडवी आदींनी परिश्रम घेतले. समाजातील विविध थरातून अरसलान चे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

No comments