आजही व्यक्तीच्या जीवनात वाचनालयाचे व ग्रंथांचे स्थान अमूल्य आहे श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सभेत शरद महाजन यांचे प्रतिपादन इद...
आजही व्यक्तीच्या जीवनात वाचनालयाचे व ग्रंथांचे स्थान अमूल्य आहे
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सभेत शरद महाजन यांचे प्रतिपादन
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आजच्या डिजिटल युगात जरी मोबाईल व इंटरनेटने माहितीचे जग जवळ आलेले असले तरी आजही व्यक्तीच्या जीवनात वाचनालयाचे व ग्रंथांचे स्थान अमूल्य आहे.श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाची तीन मजली इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. याचे संपूर्ण श्रेय विद्यमान संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनाच आहे असे प्रतिपादन श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन यांनी केले. सभेच्या सुरुवातीला मयत सभासद दिवंगत नेते, सैनिक यांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नंतर मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन ग्रंथपाल ललित इंगळे यांनी केले. प्रस्तावना चेअरमन हेमकांत गाजरे यांनी केले. अजेंड्यावरील विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये ललित बोरोले, डिगंबर इंगळे, त्रंबक इंगळे यांनी सहभाग नोंदविला. व सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.आजपर्यंत वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी देणगी दिलेल्या सर्व देणगीदारांची नावे वाचनालयाचे सचिव युवराज तळले यांनी वाचून दाखवले. सभेला जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच चेतन इंगळे, अक्षय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील फिरके , शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.के जी पाटील, सेक्रेटरी जयंत बेंडाळे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रवीण वारके, न्हावी दूध उत्पादक सहकारी संस्थेचे व्हाचेअरमन पराग वाघुळदे, माजी उपसरपंच उमेश बेंडाळे, नारायण कोलते, धीरज चौधरी, धीरज पाटील, स्वामीनारायण मंदिराचे कोठारी बी जी इंगळे, संदेश महाजन, देविदास तायडे, विलास बेंडाळे, नंदकिशोर चोपडे, जयंत कुमार फिरके, डिगंबर गाजरे यांच्यासह सभासद उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी चेअरमन हेमंत गाजरे, सचिव युवराज तळेले, संचालक प्रवीण वारके, नितीन चौधरी , गंगाराम वाघुळदे, ललित फिरके, चेतन इंगळे, प्रशांत बोरोले त्यांच्यासह ग्रंथपाल ललित इंगळे, सहग्रंथपाल सौ. कविता इंगळे व शिपाई भास्कर भोगे यांच्यासह सभासदांनी परिश्रम घेतले. आभार वाचनालयाच्या संचालक ललित फिरके यांनी मानले.

No comments