adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चास घाटाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडांच्या टोळीस एलसीबीने ठोकल्या बेड्या..बंदूक,तलवार, बेसबॉल दांड्यासह इनोव्हा जप्त

  चास घाटाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडांच्या टोळीस एलसीबीने ठोकल्या बेड्या..बंदूक,तलवार, बेसबॉल दांड्यासह इनोव्हा जप्त  सचिन...

 चास घाटाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडांच्या टोळीस एलसीबीने ठोकल्या बेड्या..बंदूक,तलवार, बेसबॉल दांड्यासह इनोव्हा जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२०):-नगर-पुणे रोडवर चास घाटाजवळ दरोड्याचे तयारीत असलेला कुख्यात गुंड व त्याचे इतर 4 साथीदार यांना 7 लाख 90,600/- रू.किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथक रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये यांना गुप्तबातमीदारा मार्फत अहिल्यानगर ते पुणे जाणारे रोडवर चास घाटाजवळ एक काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन क्रमांक एम.एच.01.व्ही.ए. 7422 हिचेमधुन गौरव घायाळ व त्याचे बरोबर 3 ते 4 इसम दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी दि.20 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास जावुन खात्री केली असता चास घाटाच्या अलीकडे एक काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन रोडचे कडेला अंधारामध्ये थांबल्याचे दिसुन आले.पथकानी सदर इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे गौरव हरीभाऊ घायाळ वय-24 वर्षे रा.सुपा ता.पारनेर जि.अहिल्यानगर,सतिष बाळासाहेब पावडे वय-35 वर्षे, मुळ रा.दरोडी,ता.पारनेर हल्ली रा.सुपा,ता.पारनेर,जि. अहिल्यानगर,अनिकेत रमेश साळवे वय- 29 वर्षे रा.ओम एन्टरप्रायजेसच्या पाठीमागे, सुपा ता.पारनेर,जि. अहिल्यानगर,विशाल सुरेश जाधव वय-23 वर्षे रा.अपधुप रोड,सुपा,ता.पारनेर जि. अहिल्यानगर,गोविंद बबनराव गाडे वय-36 वर्षे रा. ग्रामपंचायत मागे,सुपा,ता.पारनेर,जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही.पथकाने पंचासमक्ष संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात 30,000/- रु किमतीचे 1 पिस्टल व 1 जिवंत काडतुस, 500/- रुपये किमतीचे 1 तलवार,100/- रु कि.चे 1 गिलव्हर,1 बेसबॉलचा दांडका,  60,000/- रुपये किमतीचे 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 7,00,000/- रु किमतीची एक इनोव्हा चारचाकी वाहन,असा एकुण 7,90,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील आरोपी विरुध्द विरूध्द नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.839/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310 (5), 310(6), आर्म ऍ़क्ट 3/25, 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,सपोनि/हरिष भोये, पोउपनि/अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले,ह्दय घोडके,दिपक घाटकर,राहुल द्वारके,सुरेश माळी,अतुल लोटके,भिमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे,रिचर्ड गायकवाड,राहुल डोखे,सोमनाथ झांबरे,भगवान थोरात,विशाल तनपुरे,योगेश कर्डिले,भगवान धुळे,महादेव भांड यांनी केलेली आहे.

No comments