रावेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - बीडीओ विनोद मेढे ...
रावेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान"ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - बीडीओ विनोद मेढे
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानास, संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली असुन या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दि.१७.०९.२०२५ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
संयुक्त राष्ट्र संघाने "शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम २०३०" जाहीर केला असून "सर्वाना सोबत घेऊन चला" (Leave no one behind) हा या जागतिक कार्यक्रमाचा गाभा आहे. सयुक्त राष्ट्र संघाने १७ शाश्वत विकास ध्येये व त्या अंतर्गत १६९ लक्ष्ये / उद्दिष्टे जाहीर केली असून, त्यांची अंमलबजावणी दि. ०१ जानेवारी २०१६ पासून भारतात सुरु करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी शाश्वत विकासाच्या ध्येयांचे नऊ संकल्पनेमध्ये रुपांतर केले असून, त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी शासनाचे विविध विभाग मार्गक्रमण करीत आहेत,
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असुन त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेमार्फत भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे. राज्यातील विकासाच्या बहुतांश योजना पंचायत राज मार्फत राबविल्या जातात. त्याअनुषंगाने ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. ग्राम विकास विभाग व शासनाच्या इतर विभागांच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. सदर योजनांची प्रा व जलदगतीने अंमलबजावणी करून, त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, यातून ग्रा भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायती मध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायत राज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्य शासनाने जाहीर केले आहे.
मोहिमेचे प्रमुख घटक आणि विषय :
१ सुशासन युक्त पंचायत (लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन (Governance) तयार करणे)
२ सक्षम पंचायत (स्वनिधी, CSR व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे)
३ जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे
४ मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे
५ गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे
६ उपजिविका विकास व सामाजिक न्याय
७ लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे
अभियानाचा कालावधी :-
अभियानाचा कालावधी दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा राहिल.
२. अभियानाच्या शुभारंभाची तयारी, प्रचार प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना यापूर्वी सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहेत
3. संदर्भ क्र.२ च्या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. तरी दि.१७.०९.२०२५ रोजी सर्व ग्रामसभांच्या ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाचे पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात यावे.
१. सकाळी ८.४५ ते सकाळी ९.०० :- ग्रामसभा सदस्य व इतर मान्यवरांचे स्वागत
२. सकाळी ९.०० ते सकाळी ९.१० :- कार्यक्रमाचे प्रास्ताविक
३. सकाळी ९.१० ते सकाळी ९.४० :- प्रविण प्रशिक्षकांकडून अभियानाची सविस्तर माहिती
४. सकाळी ९.४० ते सकाळी १०.०० :- उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन
५. सकाळी १०.०० :- मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे व सर्व ग्रामपंचायती मध्ये "एक पेड मां के नाम" मोहीमेअंतर्गत वृक्षारोपण द्वारे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे
६. तरी उपरोक्त प्रमाणे शुभारंभ कार्यक्रमाचे नियोजन होईल याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. अभियानांतर्गत नियोजन होईल व काटेकोर अंमलबजावणी होईल असे गटविकास अधिकारी श्री विनोद मेढे यांनी रावेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना आदेश दिले आहेत.

No comments