चिनावल शिवारातील विहीरीत सापडला तरुणाचा मृतदेह रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील चिनावल शिवारात...
चिनावल शिवारातील विहीरीत सापडला तरुणाचा मृतदेह
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील चिनावल शिवारातील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह दिनांक 15सप्टेंबर रोजी दुपारी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.चिनावल -कुंभारखेडा रस्त्यावरील निखिल पितांबर भारंबे यांच्या शेतातील विहिरीत हा मृतदेह तरंगताना सापडला. मृताची ओळख पटली असून समीर सुराज तडवी (वय ३०, रा. चिनावल) असे मयत तरुणाचे नांव आहे. मयत समीर तडवी हा गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होता. सहा दिवसांनंतर त्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने ही हत्या की आत्महत्या आहे? अशा चर्चांना उधाण आले आहे
याबाबत साहिल इलमोद्दिन तडवी वय २६ राहणार चिनावल यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी तात्काळ चिनावल येथे घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी सावदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे पुढील तपास करीत आहेत.

No comments